Lok Sabha Election 2024: भाजप खासदार ठाकरेंच्या शिवसेनेत आल्याने जळगावात कोणाचा होणार गेम?

मुंबई तक

BJP MP Unmesh Patil join Shiv Sena: भाजपचे खासदार उन्मेश पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आल्याने आता जळगावात त्याचा नेमका फटका कोणाला बसणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ADVERTISEMENT

उन्मेश पाटलांमुळे भाजपला फटका बसणार?
उन्मेश पाटलांमुळे भाजपला फटका बसणार?
social share
google news

Unmesh Patil join Shiv Sena: निलेश झालटे, मुंबई: भाजपची यादी जाहीर झाली आणि काही विद्यमान खासदारांचं तिकिट कापत नव्या चेहऱ्यांना संधी दिली. यात एक महत्त्वाच नाव होतं जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांचं. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे अर्थातच उन्मेश पाटील नाराज असून त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांची भेट घेतली आणि नंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. 

उन्मेष पाटील यांच्या या धक्क्यामुळं भाजपसाठी सोपी असलेली ही लढाई आता अवघड होऊन बसलीय. एकीकडे उन्मेश पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय तर दुसरीकडे ठाकरेंनी तेथील चर्चेत असलेले उमेदवार करण पवार यांना उमेदवारी देत भाजपसाठी कडवं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे भाजपचं बनलेलं गणित उन्मेश पाटलांमुळं कसं बिघडणार आहे हेच आपण पाहणार आहोत.

जळगाव मतदारसंघाचं नेमकं गणित काय?

जळगाव लोकसभा मतदारसंघ. फार इन्ट्रेस्टिंग मतदारसंघ आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ. पण प्रत्येक वेळी विद्यमान खासदारांना, जाहीर केलेल्या उमेदवाराला धक्का देण्याचं भाजपचं धक्कातंत्र फार चर्चेत असतं. म्हणजे बघा 2019 मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने तत्कालीन खासदार ए.टी. पाटलांचा पत्ता कापला होता. ए.टी. पाटील हे दोनदा जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. त्यांना पक्षाने तिसऱ्यांदा संधी नाकारुन त्यांच्या जागी उन्मेश पाटलांना संधी दिली होती. इथे उन्मेश पाटलांच्या आधी सध्याच्या उमेदवार स्मिता वाघांना आधी तिकीट दिलेलं, मात्र ते नंतर कापलं आणि उन्मेश पाटलांना संधी मिळाली होती. अर्थातच या संधीचं सोनं करत उन्मेश पाटील हे राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांचा पराभव करत विक्रमी मतांनी जिंकत लोकसभेत पोहोचले होते. 

2014 मध्ये चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून ते आमदार झाले होते. तेव्हा उन्मेष पाटलांनी राष्ट्रवादीच्या राजीव देशमुखांचा पराभव केला होता. मात्र आता पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे त्यांचा पत्ता कापण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. 2024 मध्ये भाजपने दुसऱ्यांदा खासदारकीची संधी नाकारली. यामुळंच पाटील नाराज झाले आणि आता ठाकरेंच्या सेनेत दाखल झाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp