लाइव्ह

Lok Sabha Election 2024 : 'जनतेला राहुल गांधी पसंत नाहीत'- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Lok Sabha election 2024 Maharashtra Live update News : महाराष्ट्रात जागावाटपावरून चांगला खेळ रंगला आहे. महाविकास आघाडीतील चित्र जवळपास स्पष्ट झालेलं दिसत आहे. दुसरीकडे महायुतीमधील गोंधळ अद्यापही संपताना दिसत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक आणखी रंजक बनली आहे. या संदर्भातील सर्व माहिती आणि घडामोडींचे अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी... ( Lok Sabha election 2024 Maharashtra Live News)

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

  • 01:53 PM • 05 Apr 2024

    'जनतेला राहुल गांधी पसंत नाहीत'- चंद्रशेखर बावनकुळे

    लातूरमधील काँग्रेस उमेदवाराबद्दल बावनकुळे म्हणाले, "काँग्रेसच्या उमेदवाराला मत देणे म्हणजे राहुल गांधीला मत देणे आहे आणि देशाच्या जनतेला राहुल गांधी पसंत नाहीत..आणि सुधाकर शृंगारे यांना मत देणे म्हणजे मोदीजींना मत देणे आहे..अशीच भावना जनतेच्या मनात आहे."

    महायुती जागावाटपाबद्दल म्हणाले...

    "राज्यात सध्या दोन -तीन जागांचाच तिढा आहे आणि यासाठी दहा-बारा मिनिटांची बैठक झाली, तर तिढा सुटेल. आता त्यात फार काही किंतु परंतु राहिलेलं नाही. पुढच्या दोन दिवसात हा देखील तिढा सुटेल."

    नाना पटोले यांच्यावर टीका

    "मी नाना पटोले यांच्या वक्तव्याची निंदा करतो. नाना पटोले यांचे संजय धोत्रे यांच्यावरील वक्तव्य हे गिधाड प्रवृत्तीचे आहे. संजय धोत्रे यांनी गेले 40 वर्ष लोकांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्ही रोज संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणे योग्य नाही", असे बावनकुळे म्हणाले.

  • 12:59 PM • 05 Apr 2024

    प्रकाश आंबेडकरांना धक्का! वंचितच्या उमेदवाराचा अर्ज रद्द

    यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. अर्जात त्रुटी असल्याने राठोड यांचा हा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे. 
     

  • 12:49 PM • 05 Apr 2024

    शिंदेंचे निम्मे आमदार ठाकरेंच्या संपर्कात- विजय वडेट्टीवार

    एकनाथ शिंदेंचे निम्मे आमदार उध्दव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. असा दावा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

  • 12:48 PM • 05 Apr 2024

    विश्वजीत कदम, विशाल पाटील यांची नाराजी लवकरच दूर होईल- संजय राऊत

    “विश्वजीत कदम आणि विशाल पाटील आमचेच आहेत. त्यांची नाराजी लवकरच दूर होईल. सांगलीची जागा शिवसेनाच लढणार आहे. विशाल पाटील आणि पतंगराव कदम यांच्याविषयी आम्हाला आस्था आणि प्रेम आहे. विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेणार आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

  • ADVERTISEMENT

  • 12:47 PM • 05 Apr 2024

    अहमदनगरमधील अकोले शहरात महायुतीचा मेळावा

    अहमदनगरमधील अकोले शहरात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे, पालकमंत्री विखे पाटील या मेळाव्याला उपस्थित आहेत. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ हा मेळावा आहे. कट्टर विरोधक आमदार डॉ.किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव पिचड प्रथमच एका मंचावर आले आहेत.

  • 11:54 AM • 05 Apr 2024

    congress manifesto 2024 : 'पाच न्याय आणि 25 गॅरंटी', काँग्रेस सत्तेत आल्यास काय करणार?

     काँग्रेस पक्षाने आज आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसचा हा जाहीरनामा पाच 'न्याय' आणि 25 'गॅरंटी'वर आधारित आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी पक्षाच्या मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच, 6 एप्रिल रोजी जयपूर आणि हैदराबादमध्ये जाहीरनाम्याशी संबंधित जाहीर सभा आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

  • ADVERTISEMENT

  • 11:34 AM • 05 Apr 2024

    'प्रणिती शिंदे माझी मोठी बहिण, मी त्यांचं चारित्र्य कसं हनन करणार?'- राम सातपुते

    सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते प्रचारात आघाडी घेत आहेत.सोलापूर शहरासह जिल्ह्यात प्रचार करत सर्वसामान्य जनतेशी संवाद साधत आहेत.विरोधकांवर टीका करत राम सातपुते यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

    प्रणिती या माझ्या मोठ्या बहीण आहेत.त्यांचं चारित्र्य हनन सारखं कोणत्याही प्रकारच कृत्य केला जाणार नाही.अस राम सातपुते यांनी स्पष्ट केले आहे. प्रणिती ताईचे कसलेही व्हिडीओ आणि फोटो वायरल केले जाणार नाही.असा विश्वास राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना दिला आहे.

    शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहरात सिद्धेश्वर मंदिर तलाव परिसरात असलेल्या मॉर्निग वॉक हजेरी लावली.सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरा जवळ सकाळच्या सुमारास सोलापूरकर मोठ्या संख्येने दाखल होतात.राम सातपुते यांनी मॉर्निग वॉक येऊन संवाद साधला आणि त्यांच्यासोबत व्यायाम केला.

  • 10:06 AM • 05 Apr 2024

    Ashish Shelar : 'मातोश्रीकडे पाठ आणि सिल्वर ओकच्या दिशेने कटाक्ष"

    मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर विडबनात्मक अंदाजात टीका केली आहे. "...यांच्यापेक्षा बरा आमचा प्रभाकर मोरे!!", अशी खिल्ली शेलारांनी राऊतांची उडवली आहे. 

    आशिष शेलारांची पोस्ट 

    "मध्यरात्र झाल्यानंतर शहरातील दोन संजय एकमेकांना भेटले...!

    विश्वविख्यात हातवारे करीत, केसांचा कोंबडा उडवीत,
    मध्येच "मातोश्री"कडे पाठ आणि "सिल्वर ओक"च्या दिशेने कटाक्ष टाकीत. नजर शुन्यात टाकून "बाईट"चा हावभाव करु लागले...

    दुसरे संजय, काँग्रेसच्या पराभवाची कारणे बसले होते वाचतं!
    ते बसले होते ती खुर्ची पण होती त्यांना टोचत!!

    तू रोज बोलतोस, म्हणून अख्खा
    पक्षच गेला सोडून
    मी एकदाच बोललो आणि पक्षाला दिला राजिनामा फाडून !

    विश्वविख्यात म्हणाले...
    मला कशाला तुझ्या सोबत ओढतोस ?
    फुटक्या आघाडीला आणखी कशाला फोडतोस?

    आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे आम्हीच..
    काँग्रेस महाराष्ट्रात आमच्या समोर कमीच!

    त्यावर रामभक्त संजय खवळले आणि म्हणाले..

    उबाठा गटानेच काँग्रेसचे वाजवले तीनतेरा
    तुम्ही म्हणजे जिथे जाल तिथे सैतानाचा फेरा!

    निकाल तुम्हीच लावणार उरल्या सुरल्या काँग्रेसचा
    इंतजाम करुन ठेवा, युवराजांच्या परदेशी तिकिटाचा 

    कशाला आघाडीचं नाटक करताय?
    पायात पाय घालून एकमेकांना पाडताय?

    माझ्या राजीनाम्यासाठी दबाव तुमचा ?
    तुमच्या "खिचडीत" मीच फिरवतो आता चमचा !

    जो ना रामाचा तो काय कामाचा?

    एवढं ऐकल्यावर विश्वविख्यात चिडले..
    "सामना" रंगतदार होणार म्हणून वेटर सगळे टेबला भोवती जमले!

    गर्दी बघून दोघे ही सावरले 
    बोलती बंद अन् संवाद सगळे थांबले

    दोघांचे ही क्षणात चेहरे कसे कोरे
    यांच्या "हास्यजत्रे" पेक्षा केव्हाही
    बरा आमचा प्रभाकर मोरे!"

     

     

  • 09:02 AM • 05 Apr 2024

    Lok Sabha election Mahayuti : महायुतीत 'या' जागांचा अजूनही पेच

    सातारा - या लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसही दावा करताना दिसत आहे. मात्र, ही जागा भाजपकडे जाईल, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र, अधिकृत घोषणा झालेली नसल्याने अजूनही तर्कवितर्क लावले जात आहेत. 

    औरंगाबाद -भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षात अनेक इच्छुक असल्याने या मतदारसंघाचा गुंता अजून सुटलेला नाही. 

    पालघर - शिवसेनेकडे असलेल्या या जागेवर भाजपने दावा केला आहे, तर शिवसेना ही जागा सोडायला तयार नाही. 

    कल्याण - शिंदेंनी पहिल्या यादीत 8 उमेदवारांची घोषणा केली. पहिल्या यादीत श्रीकांत शिंदेंचं नाव असेल, असं म्हटलं जात होतं. पण, नाव न आल्याने या मतदारसंघावरून तिढा असल्याचे दिसत आहे. 

    ठाणे - या लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. 

    नाशिक - शिवसेनेचा विद्ममान खासदार असलेला हा लोकसभा मतदारसंघ महायुतीसाठी डोकेदुखी बनला आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग - युतीमध्ये शिवसेनेकडे असलेला हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे खेचल्याचे दिसत आहे, मात्र अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे शिवसेनेने अजूनही या मतदारसंघावरील दावा सोडलेला नाही. 

    दक्षिण मुंबई - मनसे महायुती येणार असल्याची चर्चा सुरू झाली. ही जागा मनसेला द्यायची की शिंदे सेनेला की, भाजपने लढवायची, हा गुंता आहे. 

    उत्तर पश्चिम मुंबई - भाजपकडे जाणार की शिंदेंच्या सेनेकडे, हे कोडे अजूनही कायम आहे. 

    उत्तर मध्य मुंबई - भाजपकडून या मतदारसंघाबद्दल गुंता नसला तरी पूनम महाजन की आशिष शेलार कि नवीन चेहरा हा प्रश्न अनुत्तरित आहे. 

  • 08:29 AM • 05 Apr 2024

    Maha Vikas Aghadi : 'वंचित'ला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा आणखी एक प्रयत्न

    पहिल्या टप्प्यातील मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलेलं असताना काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी पुन्हा एकदा हात पुढे केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीला नवा प्रस्ताव दिला आहे. 

    नाना पटोले म्हणाले,  "प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना किती जागा हव्यात आहेत, ते सांगावे. अजूनही वेळ गेलेली नाही. मी पुढाकार घेतो. पक्षश्रेष्ठींना समजावून सांगतो. आपल्याकडे अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत वेळ आहे. पण त्यानंतर लढाई सुरू झाली, तर खूप मुद्दे आहेत."

    "तुम्ही माझ्यावर मला कोणतेही अधिकार नसल्याचा आरोप करता, पण मी स्वतःच तुम्हाला आमच्यासोबत येण्याचे आवाहन करत आहे. अद्याप वेळ गेली. नाही. 2-3 जागा पाहिजे ते सांगा. पण, भाजपला पराभूत करण्यासाठी पुढाकार घ्या", असे नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे आधीच काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव देणारे प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे आहे. 

follow whatsapp

ADVERTISEMENT