Madha Lok sabha Election 2024 : माढ्याचा तिढा सुटणार! शरद पवार-मोहिते पाटलांची झाली भेट; काय झाली चर्चा ?

मुंबई तक

ADVERTISEMENT

madha lok sabha constituency sharad pawar vijaysingh mohite patil meet in marriage dhairysheel mohite patil bjp candidate ranjeetsingh nimbalkar
आज संध्याकाळी विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांची भेट झाली होती.
social share
google news

Sharad Pawar Vijaysingh Mohite Patil meet : नितीन शिंदे, सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघातून भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या उमेदवारीला रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटलांचा विरोध आहे.या विरोधातूनच आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी शिवरत्न बंगल्यावर जाऊन मोहिते पाटलांची भेट घेतली होती. यानंतर आज संध्याकाळी विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांची भेट झाली होती. या भेटीने आता माढ्याच राजकीय समीकरण बदलणार आहे. ( madha lok sabha constituency sharad pawar vijaysingh mohite patil meet in marriage dhairysheel mohite patil bjp candidate ranjeetsingh nimbalkar) 

माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून रणकंदन सुरू आहे. नाराज असलेले मोहिते पाटील तुतारी हाती घेतील अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.आणि त्याला आज जयसिंह मोहिते पाटील यांनी दुजोरा देखील दिला आहे. खरं तर अमोल कोल्हे आज दुपारी शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीतच मोहिते पाटील तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवतील,अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आज सायंकाळी विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार हे एका लग्नसोहळ्यात एकत्र दिसले होते. त्यामुळे मोहिते पाटील तुतारीच्या चिन्हावर लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे.

हे ही वाचा :  Amravati Lok Sabha Election 2024 : "नवनीत राणांना शंभर टक्के पाडणार"

 पुण्यातील कोंढव्यामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला राजकीय वर्तुळातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी शरद पवार, संजय राऊत, हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील शेजारी बसलेले दिसून आले. शरद पवार हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी बोलतानाही दिसून आले. त्यामुळे मोहिते- पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या दाव्याला आणखी बळकटी मिळाली आहे. 
 
 किमान शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यातील राजकीय संवादाचे दरवाजे पुन्हा उघडे झाले आहेत, हे स्पष्ट झाले आहे. शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची लग्नसमारंभातील ही भेट माढ्यातील राजकीय समीकरणे बदलणार का? हे आता पाहावे लागेल. ही भेट माढा लोकसभेची राजकीय समीकरणे बदलू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा :  MI vs SRH : सनरायझर्स हैदराबादने रचला इतिहास

    follow whatsapp

    ADVERTISEMENT