MI vs SRH : सनरायझर्स हैदराबादने रचला इतिहास, सर्वोच्च धावसंख्येचा RCB चा मोडला रेकॉर्ड

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ipl 2024 srh vs mi sunrises hyderabad highest sore in ipl break rcb record hardik pandya pat cummins
सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठी धावसंख्या करण्याचा विक्रम केला आहे.
social share
google news

Sunrisers Hyderabad Highest Score,MI vs SRH, IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठी धावसंख्या करण्याचा विक्रम केला आहे. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 277 धावा ठोकल्या होत्या. या धावा करून सनरायझर्स हैदराबादने एकाच सामन्यात सर्वांधिक धावसंख्या करण्याचा विक्रम रचला आहे. दरम्यान याआधी 2013 साली आरसीबीने 264  धावा केल्या होत्या. आरसीबीचा हा रेकॉर्ड आता हैदराबादने मोडीत काढला होता.  (ipl 2024 srh vs mi sunrises hyderabad highest sore in ipl break rcb record hardik pandya pat cummins) 

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.मात्र हार्दिकचा हा निर्णय काही योग्य ठरला नाही. कारण हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांनी अक्षरश धुलाई केली आहे. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 277 धावा ठोकल्या होत्या. हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने 34 बॉलमध्ये 80 धावांची नाबाद खेळी केली होती. या खेळीत त्याने 7 सिक्सर आणि 4 चौकार लगावले होते. अभिषेक शर्मा 63,  ट्रॅव्हिस हेड 62 आणि मार्करमने नाबाद 42 धावांचे योगदान दिले आहे. 

हे ही वाचा :    शिवसेना नेत्याचं कापलं तिकीट; शिंदेंनी गमावली जागा...

दरम्यान हैदराबादने मुंबईसमोर 278 धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले आहे. आता हे आव्हान मुंबई इंडियन्स पुर्ण करून आपला पहिला विजय साजरा करते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा :    Amravati Lok Sabha Election 2024 : "नवनीत राणांना शंभर टक्के पाडणार"

    follow whatsapp

    ADVERTISEMENT