Amravati Lok Sabha Election 2024 : "नवनीत राणांना शंभर टक्के पाडणार", बच्चू कडुंनी खोचल्या बाह्या

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

bachchu kadu reaction on navneet rana candidacy amaravati lok sabha election 2024 anandrao adsul mahayuti
100 टक्के त्यांना पाडणार असल्याचा निर्धार बच्चू कडू (Bachchu kadu) यांनी केला आहे.
social share
google news

Bachchu kadu Reaction On Navneet Rana candidacy : अमरावतीतून नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नवनीत राणा भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढवताना दिसणार आहे. दरम्यान नवनीत राणा यांच्या उमेदवारीला शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि आनंदरराव अडसूळ यांनी विरोध केला होता. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही नवनीत राणांना (navneet rana) हा विरोध कायम असणार असून त्यांचा प्रचार करणार नाही. 100 टक्के त्यांना पाडणार असल्याचा निर्धार बच्चू कडू (Bachchu kadu) यांनी केला आहे. त्यामुळे नवनीत राणांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.  (bachchu kadu reaction on navneet rana candidacy amaravati lok sabha election 2024 anandrao adsul mahayuti) 

नवनीत राणा यांना अमरावतीतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली होती. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, नवनीत राणा यांना आमचा विरोध कायम असणार आहे. आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. 100 टक्के करणार नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली. तसेच नवनीत राणांसाठी ही निवडणूक सोप्पी राहणार नाही, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे. 

हे ही वाचा : Yavatmal washim : ठाकरेंनी जुना शिवसैनिक उतरवला मैदानात, कोण आहेत संजय देशमुख?

दरम्यान अमरावतीतील उमेदवारीबाबत बच्चू कडू यांनी आपले म्हणणे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडले होते. यावर बच्चू कडू म्हणाले, ''पक्षश्रेष्ठींना कल्पना देऊनही काही उपयोग झाला नाही. भापचाच उमेदवार आम्ही देणार आहोत. त्यानुसार  शिंदे साहेब फडणवीसांशी बोलत होते'' असे त्यांनी सांगितले होते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अमरावती मतदार संघातून बच्चू कडू भाजपचाच उमेदवार उभा करणार होते. आता या उमेदवाराबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले, ''आता त्यांनी (भाजपने)  उमेदवारी जाहीर केली, आता आम्हाला उमेदवार देण्याने फायदा होणार आहे की नाही, ते आम्ही पाहून निर्णय घेऊ'', असे बच्चू कडू यांनी म्हटले. 

नवनीत राणा यांना आम्ही जिंकू देणार नाही. आम्ही 100 टक्के त्यांना पाडू. आता ते आम्ही त्यांना कस पाडणार ते आम्ही ठरवू. पण त्यांच्या विरोधात प्रचार करू. त्यामुळे आता भाजपला त्यांचा उमेदवार ठेवायचाय की, नाही ठेवायचाय हा त्यांचा प्रश्न आहे. पण भाजपला आमची काही गरज वाटली नसेल म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असेल असे बच्चू कडूंनी सांगितले. 

हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : लोकसभेआधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार?

नवनीत राणांनी बच्चू कडू आणि अडसूळ आमचा प्रचार करतील अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर बोलताना कडू म्हणाले की, त्यांच्या बापाची जहांगीर आहे का? त्यांना (भाजपला) नाही तिकडे आम्ही लाचारी करणार आहे. नवनीत राणांना आमचा विरोध काय राहणार आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणाला फटका बसेल याचा विचार आमच्यापेक्षा त्यांनी करावा, असे देखील बच्चू कडू यांनी भाजपला उद्देशून म्हटले आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT