Maharashtra Lok Sabha Election 2024: आज मतदान... तुमच्या मतदारसंघात 'हे' आहेत उमेदवार!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

तुमच्या मतदारसंघात 'हे' आहेत उमेदवार!
तुमच्या मतदारसंघात 'हे' आहेत उमेदवार!
social share
google news

Maharashtra Lok Sabha Election 2024 Voting Candidates in your constituency: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी आज (7 मे) संपूर्ण देशात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. देशात एकूण 94 मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात ज्या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मतदारसंघांचा प्रामुख्याने समावेश आहे. मतदानाला जाण्याआधी जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात नेमके कोण-कोण उमेदवार आहेत. (maharashtra lok sabha election 2024 only a few hours left for the third phase of voting know who are the candidates in your constituency)

ADVERTISEMENT

रायगड, बारामती, उस्मानाबाद (धाराशिव), लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 11 मतदारसंघात निवडणूक होणार आहे. आता याच मतदारसंघात कोणकोणते महत्त्वाचे उमेदवार हे रिंगणात आहेत हे आपण पाहूयात.

तिसरा टप्पा - 11 मतदारसंघातील महत्त्वाचे उमेदवार

1. रायगड

हे वाचलं का?

  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- सुनील तटकरे
  • शिवसेना (ठाकरे) - अनंत गीते
  • वंचित - कुमुदिनी चव्हाण

 
2. बारामती 

  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - सुनेत्रा पवार
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - सुप्रिया सुळे

हे ही वाचा>> तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द

3. धाराशिव

ADVERTISEMENT

  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - अर्चना पाटील
  • शिवसेना (ठाकरे) - ओमराजे निंबाळकर 
  • वंचित - भाऊसाहेब आंधळकर

 
4. लातूर 

ADVERTISEMENT

  • भाजप - सुधाकर श्रृंगारे
  • काँग्रेस - शिवाजीराव कलगे
  • वंचित - नरसिंहराव उदगीरकर 

5. सोलापूर 

  • भाजप - राम सातपुते
  • काँग्रेस - प्रणिती शिंदे

6. माढा 

  • भाजप - रणजितसिंह नाईक निंबाळकर 
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - धैर्यशील मोहिते पाटील
  • वंचित - रमेश बारसकर

7. सांगली 

  • भाजप - संजय काका पाटील
  • शिवसेना (ठाकरे) - चंद्रहार पाटील
  • अपक्ष - विशाल पाटील (वंचित पाठिंबा)
  • ओबीसी स्वतंत्र पक्ष - प्रकाश शेंडगे

हे ही वाचा>> सोमय्यांनी काढलेल्या वायकर, जाधवांच्या घोटाळ्यांचं पुढे काय झालं? 

8. सातारा 

  • भाजप - उदयनराजे भोसले
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - शशिकांत शिंदे
  • वंचित - प्रशांत कदम
  • अपक्ष - अभिजीत बिचुकले

9. रत्नागिरी सिंधुदुर्ग 

  • भाजप - नारायण राणे
  • शिवसेना (ठाकरे) - विनायक राऊत
  • वंचित - मारोती काका जोशी

10. कोल्हापूर 

  • शिवसेना (शिंदे ) - संजय मंडलिक
  • काँग्रेस - शाहू महाराज छत्रपती 

11. हातकणंगले

  • शिवसेना (शिंदे) - धैर्यशील माने 
  • शिवसेना (ठाकरे) - सत्यजित पाटील 
  • स्वाभिमानी - राजू शेट्टी 
  • वंचित - दादासाहेब चवगौंडा पाटील

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT