मुंबई Tak चावडी: 'सावंतजी... PMO से फाइल आ गयी तो साईन कर दो...', अरविंद सावंतांनी सांगितला PM मोदींचा 'तो' किस्सा

मुंबई तक

ADVERTISEMENT

अरविंद सावंतांनी सांगितला PM मोदींचा 'तो' किस्सा
अरविंद सावंतांनी सांगितला PM मोदींचा 'तो' किस्सा
social share
google news

Arvind Sawant Mumbai Tak Chavadi: मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांच्या कॅबिनेटमध्ये एकाधिकारशाही चालते असा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना (UBT)नेते अरविंद सावंत यांनी मुंबई Tak चावडीवर बोलताना केला. (mumbai tak chavadi sawantji the file has come from pmo so sign it arvind sawant tells pm modi cabinet story)

पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणाला फारशी मुभा नसते. सगळं काही आधी ठरलेलं असतं तेवढ्याच गोष्टी मांडल्या जातात. असं म्हणत अरविंद सावंत यांनी मोदींच्या कॅबिनेटमध्ये नेमकं काय घडतं हे चावडीवर सांगितलं. याशिवाय ते जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांना एका फाइलवर सही करण्यासाठी कशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं याचा नेमका किस्सा सांगितला आहे. 

'PMO से फाइल आ गयी तो साईन कर दो...'

'मला त्यांनी एकदा असं सांगितलं की, मी एक फाइल पेंडिंग ठेवली होती. म्हटलं हे कसं काय करता तुम्ही.. कंपनी तोट्यात नाहीए.. फक्त नफ्यात घट आहे.. जर कंपनीला नवं कंत्राट मिळालं तर कंपनीला मोठं कंत्राट मिळेल. मला हे माहिती होतं की, याला मागच्या आठवड्यात एक कंत्राट मिळालं आहे 7-8 हजार कोटीचं.. त्यामुळे ती कंपनी नफ्यात येईल.'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'दुपार झाली, उठले असतील आणि सुपारी...', उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा!

'तर फाइलवर लिहलं होतं. की, या संबंधित खात्याचे मंत्री चर्चा करून सही करतील. तर संबंधित खात्याचे मंत्री कोण तर नितीन गडकरी, अरविंद सावंत आणि निर्मला सीतारामण.. पण आम्ही कधी यावर चर्चाच केली नव्हती. त्या दोघांनी सही करून फाइल माझ्याकडे पाठवून दिली होती.' 

'मी म्हटलं अरे... निर्मलाताईंनी फोन केला.. अरविंदजी एक फाइल पेंडिंग आहे. मी त्यांना म्हटलं की, मला याबाबत काही गोष्टींवर योग्य स्पष्टीकरण हवं आहे. त्या लगेच म्हणाल्या.. ओह.. ओह... तुम्ही पी. के. मिश्रा (मुख्य सचिव) यांच्याशी बोला..' 

ADVERTISEMENT

'मी त्यांच्याशी बोललो.. बाबा रे.. असं मला वाटतं की, जरा बोललेलं बरं.. तर ते नाही म्हणाले. म्हणे मी सांगतो..' 

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'फडतूणवीसचे नोकर नाही...', उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर जहरी टीका

'नंतर कॅबिनेट बैठकीमध्ये थोडासा मधला वेळ मिळतो केव्हा तरी आम्हाला.. तेव्हा मी पंतप्रधानांना गाठलं. म्हटलं सर कंपनी तर नफ्यात चालली आहे मग आपण का असं दाखवत आहोत..' 

'ते (पंतप्रधान मोदी) यावर म्हणाले, 'सावंतजी अपने पास चर्चा नही होती.. प्रधानमंत्री कार्यालय से फाइल आ गयी तो साईन कर दो... लोकशाही..' 

'मी केली सही.. असं कशाला खोटं बोलेन मी.. सही केली.. त्यांचा आदर मी तेवढा राखला. मी उद्धवजींच्या कानी घातलं.. हा कारभार आहे बघा असा. त्यामुळे मला मंत्रिपदाचा कधी आनंद नाही वाटला.' असं म्हणत अरविंद सावंत यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात नेमकं काय घडलं होतं यावर भाष्य केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT