Modi Cabinet 2024 : बुलढाण्याचा खासदार होणार केंद्रीय मंत्री! कोण आहेत प्रतापराव जाधव?

मुंबई तक

ADVERTISEMENT

pm modi cabinet prataprao jadhav buldhana shiv sena shinde mp pm narendra modi swearing in ceremony
शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao jadhav) यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे
social share
google news

Shiv Sena MP Prataprao jadhav : नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मोदींसोबत जवळपास 30 ते 40 मंत्र्यांचा देखील शपथविधी होणार आहे. या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचा देखील समावेश असणार आहे. महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao jadhav) यांना  केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे.त्यामुळे केंद्रात मंत्रीपद वर्णी लागणारे खासदार प्रतापराव जाधव नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (pm modi cabinet prataprao jadhav buldhana shiv sena shinde mp pm narendra modi swearing in ceremony)

 शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिलेल्या प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभेतून विजय मिळवला होता. हा विजय मिळवून जाधव यांनी खासदारकीचा चौकार मारला आहे. कारण याआधी 2009,2014,2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जाधव विजयी ठरले होते. त्यामुळे त्यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रीपदाची माळ पडणार असल्याचे निश्चित आहे.

कोण आहेत प्रतापराव जाधव? 

प्रतापराव जाधव यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1960 रोजी बुलढाणा तालुक्यातील मेहेकर येथे झाला होता. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बुलढाण्याच्या चिखलीतील शिवाजी कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले आहे. बीएच्या दुसऱ्या वर्षापर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. 

हे ही वाचा : PM Modi new cabinet list : मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी? पाहा संपूर्ण यादी

प्रतापराव जाधव यांना सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

ADVERTISEMENT

बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून प्रतापराव जाधव शिवसेनेत कार्यरत आहेत.

ADVERTISEMENT

मेहकर तालुका खरेदी विक्री समितीचे 1990 ते 1995 पर्यंत सभापती होते. 

1992 ते 1995 पर्यंत पंचायत समितीचे सदस्यपद त्यांनी सांभाळले आहे.

उपज मंडी, मेहकर जिल्हा बुलढाण्याचे संचालक पदावर  1992 ते 1996 पर्यंत ते होते. 

तसेच बुलढाणा जिल्हा कॉपरेटीव्ह बँकेचे उपाध्यक्षपद त्यांनी 2010 ते 2015 पर्यंत भुषवलं होतं.

1995 मध्ये ते पहिल्यांदा मेहकर मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेले होते. 

हे ही वाचा : "... म्हणून 'मविआ'सोबत आघाडी केली नाही", आंबेडकरांचे गंभीर आरोप

1999 आणि 2004 या विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी मतदारसंघात आपली पकड मजबूत ठेवली होती. 

प्रतापराव जाधव यांना 2009 साली बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवलं. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांचा 28 हजार मतांनी पराभव केला होता. 

2014 साली प्रतापराव जाधव दुसऱ्यांदा खासदार म्हणून संसदेत पोहोचले होते. 

त्यानंतर 2019 मध्ये तिसऱ्यांदा प्रतापराव जाधव खासदार म्हणून संसदेत पोहोचले होते. 

आता 2024 ची लोकसभा निवडणूकही त्यांनी जिंकली होती. त्यामुळे सलग चार वेळा प्रतापराव जाधव खासदार झाले आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT