PM Modi : "भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी...", मोदींनी कुणाला दिला इशारा?
PM Narendra Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेरठमध्ये जाहीर सभा घेऊन निवडणुकीचा बिगुल वाजवला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पंतप्रधान मोदींची इंडिया आघाडीवर टीका
मेरठमधील सभेतून केला शंखनाद
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा फोडला नारळ
PM Modi Meerut : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेरठमध्ये जाहीर सभा घेऊन निवडणुकीचा शंखनाद केला. विरोधकांवर मोदींनी हल्ला चढवला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर जोर देत मोदींनी अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली.
ADVERTISEMENT
मोदी म्हणाले की, मेरठची भूमी ही क्रांती आणि क्रांतिकारकांची भूमी आहे. या जमिनीशी माझे वेगळे नाते आहे. 2014 आणि 2019 मध्ये मी माझ्या निवडणूक प्रचाराची सुरुवात मेरठमधून केली होती. आता 2024 च्या निवडणुकीची पहिली रॅली मेरठमध्येच होत आहे. 2024 च्या निवडणुका केवळ सरकार बनवण्यासाठी नाहीत. कोण खासदार व्हावे आणि कोणाला करू नये, म्हणून ही निवडणूक नाही, तर यंदाची निवडणूक ही विकसित भारत घडवण्यासाठीची आहे. 2024 चा जनादेश भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनवेल."
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मोदी म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी मेरठच्या सभेत भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला. ते म्हणाले, "मी भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करत आहे, त्यामुळे काही लोकांचा संयम सुटला आहे. मी म्हणतो मोदींची गॅरंटी सांगते की, भ्रष्टाचार हटवा, ते (इंडिया आघाडी) म्हणतात की भ्रष्टाचारी वाचवा."
हे वाचलं का?
"ही निवडणूक दोन आघाड्यांमधील लढाई आहे. एनडीए भ्रष्टाचार हटवण्यासाठी मैदानात उतरली आहे. भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी इंडिया आघाडी मैदानात उतरली आहे. माझा भारत हेच माझे कुटुंब आहे", असे मोदी यावेळी म्हणाले.
हेही वाचा >> ठाकरे फडणवीसांना म्हणाले, 'मी सगळा खर्च करतो'; बावनकुळेंनीही केला पलटवार
"मी भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध मोठी लढाई लढत आहे. त्यामुळेच आज बडे भ्रष्टाचारी तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयातूनही त्यांना जामीन मिळत नाही. त्यामुळे या भ्रष्ट लोकांना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. मी केवळ अशा लोकांवर कारवाईच करत नाही, तर ज्यांचे पैसे या अप्रामाणिक लोकांनी लुटले आहेत, त्यांना त्यांचे पैसे मी परत करत आहे", असे विधान मोदींनी केले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> "400 काय 180 चा टप्पाही...", राहुल गांधींचं भाजपबद्दल मोठं भाकित
"मी भ्रष्टाचाऱ्यांना सांगतोय की, मोदींवर कितीही वेळा हल्ला करा. मोदी झुकणार नाहीत. भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई नक्कीच होईल. ज्याने देश लुटला त्याला पैसा परत द्यावा लागेल", असे नरेंद्र मोदी या रॅलीत म्हणाले.
ADVERTISEMENT
'ज्याला कोणी विचारले नाही त्याचीच मोदींनी पूजा केली'
"गरिबीला कंटाळून मी इथपर्यंत पोहोचलो. त्यामुळे प्रत्येक गरीब व्यक्तीचे दुःख आणि वेदना मला चांगलीच समजते. आम्ही गरिबांसाठी योजना आणल्या. 5 लाखांपर्यंतच्या उपचारांसाठी आयुष्मान योजना तयार केली. आमचे सरकार 80 कोटी गरिबांना मोफत रेशन देत आहे. ज्याला कोणी विचारले नाही, त्याचीच पूजा मोदींनी केली आहे", असे मोदी यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT