PM Modi : मंगळसूत्र ते मुस्लीम... 32 प्रश्न अन् पंतप्रधान मोदी; वाचा खास मुलाखत
PM Narendra Modi on mangalsutra muslim and lok sabha election : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आज तक'ला खास मुलाखत दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आजतक'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी मंगळसूत्र ते मुस्लीम आणि जम्मू काश्मीरपासून ते केरळ... विरोधकांच्या प्रत्येक आरोप आणि निवडणुकीतील मुद्द्यांवर भूमिका मांडली. इंडिया टुडे ग्रुप न्यूजचे संचालक राहुल कंवल, व्यवस्थापकीय संपादक अंजना ओम कश्यप, व्यवस्थापकीय संपादक श्वेता सिंग आणि सल्लागार संपादक सुधीर चौधरी यांच्या प्रश्नांना पंतप्रधानांनी उत्तरे दिली.
32 प्रश्न, चार संपादक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी! संपूर्ण मुलाखत वाचा जशीच्या तशी....
अंजना,
नमस्कार, आपण पाहात आहात आज तक.. मी आहे अंजना ओम कश्यप..
वो जो मेरे सामने मुश्किलो का अंबार है.. उसीसें होसलों की मिनार है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आपणच लिहिलेल्या कवितेच्या या दोन ओळी आहेत. तुम्ही 400 पार करण्याचं ध्येय असलेलं स्वप्न पाहिलं आहे. यावरच बोलण्यासाठी माझे तीन सहकारी माझ्यासोबत आहेत. श्वेता सिंह, राहुल कंवल आणि सुधीर चौधरी.. आम्ही चौघं तुमच्याशी प्रश्नउत्तरं विचारणार आहोत.
मोदी – आपल्या सर्वांचं स्वागत.. आज तकच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार.. मला आनंद होतो की, संपूर्ण निवडणुकीत आज तकच्या लोकांना मला भेटण्याचा योग आला. पण चार जण एकत्र आले की, काही प्रकारच्या म्हणी आहेत. पण चांगली म्हण म्हणू शकेल.
प्रश्न – प्रधानमंत्रीजी, लोक निवडणुकीची तयारी करतात तेव्हा उमेदवारांची यादी तयार करतात. कोण स्टार प्रचारक असणार.. आणि जाहीरनामा तयार करतात. पण तुम्ही पुढील 100 दिवसांचा अजेंडा तयार करत आहात. यावरच माझा प्रश्न आहे की, 2014 मध्ये तुम्ही सत्तेत आल्यावर 100 दिवसांच्या आत काळ्या पैश्यांवर एसआयटी स्थापित केली. 2019 मध्ये 62 व्या दिवशी ट्रिपल तलाक पासून मुक्ती दिली आणि 66 व्या दिवशी काश्मिरमध्ये कलम 370 रद्द केलं. 2024 तुम्ही सत्तेत आलात तर 100 दिवसांमध्ये काय करणार? आणि कोणते कठोर निर्णय घेणार?
मोदी – एक तर हा माझ्या कार्यशैलीचा भाग आहे. मी गोष्टी आधीच चांगल्या पद्धतीनं करतो. मी जेव्हा संघटनेचं काम करायचो तेव्हा पण मी आधीच ठरवायचो की, मला यावेळी हे करायचं आहे.. त्यावेळी ते करायचं आहे. त्यामुळे मी वेळेचा योग्य वापर करतो आणि प्राधान्यक्रम पण सहजतेनं ठरवतो. मी कोणत्या मॅनेजमेंट स्कुलचा विद्यार्थी नाही पण, काम करत करत या गोष्टी डेव्हलप होत गेल्या. मी जेव्हा गुजरातमध्ये होतो तेव्हा गुजरातमध्ये पण जे क्रिटिक्स असतात, ऑब्जर्वर्स असतात ते पहिल्यांदा काय घडतं ते पाहतात. सुन पण जेव्हा लग्न करुन घरी येते तेव्हा पहिल्या सात आठ दहा दिवसांत सुन पाय कशी ठेवते, हे पाहिलं जातं. हे स्वाभाविक आहे. हा दुनियेचा नियम आहे. मला वाटलं की मला अड्रेस पण करावं. मी त्या दिशेनं चाललो. मी आता एक इंटरेस्टिंग घटना सांगतो. 26 जानेवारीला गुजरातमध्ये भूकंप झाला. हा भूकंप भयंकर होता. तेव्हा मी पार्टीचं काम करायचो. ऑक्टोवर सेवनला मला अचानक मुख्यमंत्री व्हावं लागलं. सीएमचा ताफा घेवून मी थेट भूकंपग्रस्त भागात गेलो. दोन तीन रात्र मी तिथेच राहिलो आणि काही गोष्टी पाहिल्या. आधी मी वॉलिटेंरच्या रुपात पाहायचो आता सीएम म्हणून मी पाहत होतो. पुन्हा मी येऊन मी माझ्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली. सर्वांनी सांगितलं की मार्च महिन्यापर्यत हे होईल. मी त्यांना सांगितलं की सर्वात आधी तुम्ही तुमचं बजेटचं मार्चवालं कॅलेंडर बाजूला ठेवा. मी म्हणालो, की तुम्ही मला सांगा की, 26 जानेवारीच्या आधी तुम्ही काय करणार? जग 26 जानेवारीला येऊन पाहिल की एका वर्षात तुम्ही काय केलं? सर्व प्रिपॉन करा आणि मला सांगा.. पुन्हा मी सर्व मशीनरींना मोबिलाईज केलं आणि मी इथं दिल्लीत येऊन 24 जानेवारीला दिल्लीत येऊन प्रेस घेतली होती. आणि माझ्या देशाला रिपोर्ट कॉर्ड दिलं होतं. तेव्हा माझा अनुमान होता की मोठ्या प्रमाणात मीडिया गुजरातमध्ये पोहोचला होता. जो मीडिया आम्हाला पर्दाफाश करण्याची वाटच पाहत होता. पण तुम्ही मजा पाहा.. 24,25,26 जानेवारीचे रिपोर्ट पाहा. त्यात कौतुकाशिवाय काही नव्हतं. त्याचं एक कारण होतं की, मी मार्चच्या डेडएन्डला प्रीपोन केलं. माझ्या टीमचा उत्साह वाढला की यार देखिए आपलं यश रिक्नाईझ होत आहे. मी ही ताकद समजतो. त्यामुळे दुसरं मी हे नाही चिंतत की सरकार चालतं. आणि यार काही चांगली गोष्ट येईल. आणि पाहून घेऊ. सरकार मला चालवायचं आहे. सरकार चालतं म्हणून मला लोकांनी इथं बसवलं नाही. मला देशात काही गोष्टी चालवायच्या आहेत. आणि काही गोष्टी बदलायच्या आहेत. त्यामुळे माझ्याजवळ .. मी काय केलं की 2014 ला 100 दिवसांचा विचार केला. पाच वर्षांसाठी मॅनिफेस्टो होता. 2019 मध्ये मी हे पाहिलं की.. सोबत सोबत मी ग्लोबल दृष्टीकोनाविषयी माझं लक्ष केंद्रीत केलं. 2024 मध्ये माझा विचार थोडा मोठा आहे. मी मागील पाच वर्षांपासून 2047 वर काम करतोय. हे मागील 5 वर्षापासून सुरु आहे. देशाच्या 20 लाखांपेक्षा जास्त लोकांकडून मी इनपूट घेतले आहेत. मी याच्या आधारे 47 चे एक व्हिजन डॉक्युमेंट बनवलं. दोन अधिकाऱ्यांची याच्यावर काम करत करत रिटायर्ड झाली असेल. पण काही नवीन लोक आले आहेत. पण आता म्हणालो की, निवडणूक घोषित होण्याच्या आधी एक महिना माझ्या पूर्ण मोठ्या काऊंसिल आणि सचिवांची समिट केली होती. मी म्हणालो हे 2047 आहे ना.. तुम्ही मला 5 वर्षात प्रायोरिटी सांगा..पाच वर्षाचा मी मॅप बनवला. पुन्हा मी सांगितलं की मला यातील 100 दिवसांचा मॅप काढून द्या... एक्सल पॉईंट.. पुन्हा मी सांगतो की, माझी प्रायोरिटी वन ही असेल.. प्रायोरिटी बी ही असेल.. प्रायोरिटी 1 सी ही असेल आणि प्रायोरिटी 2 ए ही असेल आणि प्रायोरिटी 2 बी ही असेल. याच्याआधारावर तुम्ही काही करा. तर यावर ते काम करत आहेत. त्यांनी तयार केलं आहे. माझी त्यांच्यासोबत अजून बैठक झाली नाही. मी काही वेळ काढून नक्की बैठक करेल. तर हे माझं तयार आहे. पण आता माझ्या मनात काम करत असताना नवीन विचार आला आहे. जो की पहिल्यांदाच मी तुमच्यासमोर सांगत आहे. जेव्हा मी 100 दिवसांचा विचार करत होतो पण आता मी 125 दिवसांचा विचार करत आहे. आणि मी उत्साहित पण झालो आहे. मी या सर्व कॅम्पेनमध्ये पाहिलं की फर्स्ट टाईम वोटर असेल, युवा पिढी असेल. यांच्यात मी वेडेपणा पाहतोय. मी त्यांच्या एस्पिरेंशन्स फील करतोय. मी आजकाल अनाउंस करणार आहे. की, मी आता 125 दिवसांवर काम करु इच्छित आहे. 100 दिवसांचा प्लान मी केला आहे. मी 25 दिवस आणखी जोडू पाहत आहे. मी त्यात प्युअरली युथ ना चिंतत आहे की, तुम्ही मला आयडियाज द्या. तुम्ही मला तुमची प्रायोरिटी सांगा. तर मी 25 दिवस देशातील युवकांसाठी टोटली डेडिकेट करु इच्छित आहे. मी आता 125 दिवसांचं काम करणार आहे. मी आता 25 दिवसांसाठी पुढे जात आहे.
