Rahul Gandhi : निर्णय झाला, काँग्रेसची मोठी घोषणा! राहुल गांधी 'या' मतदारसंघातून लढणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

राहुल गांधी
social share
google news

Rahul Gandhi Raebareli : रायबरेली आणि अमेठी या दोन लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार, हा प्रश्न निकाली निघाला. काँग्रेसने शुक्रवारी सकाळी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यात एक नाव राहुल गांधी यांचे असून, ते रायबरेली लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत. अमेठी लोकसभा मतदारसंघातू के.एल. शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी देण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रियांका गांधी निवडणूक लढवणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. (Rahul Gandhi is Contesting From Raebareli)

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने आपले पत्ते उघड केले आहेत. पक्षाने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सोनिया गांधी यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवत होते, पण यावेळी मतदारसंघात बदल करण्यात आला आहे. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून सोनिया गांधी या निवडणूक लढवायच्या, पण त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या राजस्थानमधून राज्यसभेमध्ये निवडून गेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने राहुल गांधी यांना उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा >> "ठाकरेंनी मला फोन केला... मला विचारलं की, तुमचा सल्ला काय?", मोदींनी सांगितला 'तो' किस्सा 

केएल शर्मा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. शर्मा हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. आतापर्यंत ते रायबरेलीत खासदार प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळायचे. 

ADVERTISEMENT

पहिल्याच बिगर गांधी-नेहरू घराण्यातील उमेदवार

सात टप्प्यातील सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही जागा परंपरागतपणे गांधी-नेहरू घराण्यातील सदस्यांकडे आहेत. पक्षाने पहिल्यांदाच अमेठीतून बिगर गांधी कुटुंबातील उमेदवार उभा केला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> महाराष्ट्रातील 9 खासदारांना झटका, तिकिटं का कापली?

अमेठीच्या भाजप खासदार स्मृती इराणी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर रायबरेलीमधून भाजपने दुसऱ्यांदा दिनेश प्रताप सिंह यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

2019 च्या निवडणुकीत दिनेश यांचा पराभव झाला होता. 2019 मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रायबरेलीमधून विजयी झाल्या होत्या.

2014 आणि 2019 मध्ये अमेठी मतदारसंघात राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात निवडणूक लढत झाली होती. 2014 मध्ये राहुल गांधी विजयी झाले होते. तर 2019 मध्ये स्मृती इराणींनी मोठा धक्का देत पहिल्यांदाच विजय मिळवला होता.

हेही वाचा >> निकालाआधीच काँग्रेसने गमावल्या दोन जागा, महाराष्ट्रात थोडक्यात वाचली!

यावेळी काँग्रेसने अमेठीत नवी खेळी खेळली असून, त्यांचे निकटवर्तीय किशोरीलाल शर्मा यांना मैदानात उतरवून आश्चर्यचकित केले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT