Lok Sabha election : 'मविआ'त सांगलीचा वाद चिघळला! राऊत म्हणाले, "आम्ही निर्णय घेतलाय"
Sangli Lok Sabha election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील वाद चिघळताना दिसत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणूक 2024

महाविकास आघाडीत मतदारसंघावरून वाद

काँग्रेस-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमने सामनेे
Sangli lok Sabha election 2024 : (स्वाती चिखलीकर, सांगली) सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील वाद चिघळताना दिसत आहे. काँग्रेस सांगलीच्या जागेवरील दावा सोडायला तयार नसल्याने शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी थेट इशारा दिला आहे. "आम्ही मैदानात उतरलो, तर मागे पुढे बघणार नाही. आलात तर तुमच्याबरोबर नाही तर तुमच्याशिवाय", असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ( Sanjay Raut Said if congress will not come with us Shiv Sena UBT will fight election alone)
सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील इच्छुक आहेत. तर ही जागा काँग्रेसकडे रहावी म्हणून विश्वजीत कदम यांनीही ताकद लावली आहे. विश्वजीत कदम यांनी काँग्रेसच्या बैठकांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते या जागेसाठी अडून बसले आहेत. दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना ही जागा सोडायला तयारी नाही. त्यात राऊतांनी मोठं विधान केल्यानं महाविकास आघाडीच्या एकजुटीबद्दलच्या प्रश्नाने डोकं वर काढलं आहे.
कारण काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला नागपूरमध्ये बोलताना म्हणाले की, "सांगलीचा विषय आज सुटून जाईल. आघाडी असताना प्रत्येक पक्ष हा दावा करत असतो. आज किंवा उद्या सांगलीचा विषय सुटलेला असेल", रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं. पण, राऊतांच्या आर या पार च्या विधानाने मविआत सांगलीत बिघाडी होताना दिसत आहे.
सांगलीच्या जागेबद्दल संजय राऊत काय बोलले?
राऊत यांनी थेट काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनाही दिल्लीत जाऊ काय चर्चा करणार असंही म्हटलं आहे.