Lok Sabha : साताऱ्यात भाजपचा उमेदवार ठरला! गिरीश महाजनांकडून 'या' नेत्याच्या नावाचे संकेत
Satara Lok Sabha Constistuency : गिरीश महाजन यांनी आज उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेसमध्ये जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर महाजन भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्यावर दाखल झाले होते. यावेळी गिरीश महाजनांची दोन्ही नेत्यांसोंबत त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी बंददाराआड चर्चा झाली.
ADVERTISEMENT

Satara Lok Sabha Constistuency : माढ्याच्या तिढ्यावर चर्चा केल्यानंतर ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे संकटमोचक साताऱ्याचा तिढा सोडवण्यासाठी जिल्ह्यात दाखल झाले होते. यावेळी गिरीश महाजन (girish Mahajan) यांनी उदयनराजे भोसले (Udayanraje bhosale) आणि शिवेंद्रराजे (shivendra raje) या दोन नेत्यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांसोबत गिरीश महाजनांची बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी नेमका कोणता उमेदवार साताऱ्यातून लोकसभा लढवणार याचे नावचं जाहीर केले आहे. (satara lok sabha constituency girish mahajan meet udayanraje bhosale shivendra raje bhosale narendra patil maharashtra loksabha constituency )
खरं तर सातारा लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीत वेगळा ट्विस्ट निर्माण झाला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांनी तयारी सुरु केली आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र पाटील इच्छुक आहेत. आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी आम्हालाच तिकीट मिळणार असे सांगून कामास सुरुवात केली आहे. त्यामुळे साताऱ्यात महायुतीवरून त्रांगड निर्माण झाले आहे. हा तिढा सोडवण्यासाठी आज गिरीश महाजन साताऱ्याल दाखल झाले होते.
हे ही वाचा : खरंच अशोक चव्हाण सोनिया गांधींसमोर रडले का?
गिरीश महाजन यांनी आज उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेसमध्ये जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर महाजन भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्यावर दाखल झाले होते. यावेळी गिरीश महाजनांची दोन्ही नेत्यांसोंबत त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी बंददाराआड चर्चा झाली. यामध्ये उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांच्या भूमिकेबाबत व आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर गिरीश महाजन यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे.
शिवेंद्र राजेंची भेट घेतल्यानंतर गिरीश महाजन माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले आहे. आमची सविस्तर चर्चा झाली. तसेच काहीच दिवसांपूर्वी नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजेंची भेट घेतली होती. या भेटीवर महाजन म्हणाले, इच्छुक उमेदवार तर सगळीकडेच असतात, त्यांच काम सगळ्यांना भेटण आहे. सातारा लोकसभेची तिढा सुटला नाही. कारण अजून जागावाटपही झाले नाही आणि फॉर्म भरायलाही सुरुवात झाली नाही. आता इतक्या चुटकी सरशी काम असतं तर अख्ख्या महाराष्ट्रात मलाच पाठवलं असतं, असे महाजन यांनी सांगितले. तसेच शिवेंद्र राजेंची लोकसभेची काही मागणी नाही, असे देखील महाजनांनी स्पष्ट केले.