Sanjay Mandlik : "थेट वंशज आहात, हे सिद्ध करा", मंडलिकांचं शाहू महाराजांना चॅलेंज
Kolhapur Lok Sabha election 2024, Sanjay Mandlik Controversial statemenet : महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपतींबद्दल केलेल्या विधानाने निवडणूक चर्चेत आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या विधानाने वाद
शाहू महाराज छत्रपतींना मंडलिकांनी दिलं चॅलेंज
Sanjay Mandlik Kolhapur : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केलेल्या एका विधानाने वाद उभा राहिला आहे. शाहू महाराजांबद्दल केलेल्या विधानाबद्दल माफी मागा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात असतानाच मंडलिक यांनी आता थेट शाहू महाराज छत्रपतींना आव्हान दिलं आहे. समजून घ्या नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती अशी लढाई होत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल एक विधान केले.
नेसरी येथे बोलताना मंडलिक म्हणाले होते की, "आताचे शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरचे आहेत का? दत्तक आले आहेत. ते खरे वारसदार नाहीत. आम्ही कोल्हापुरची जनताच खरी वारसदार आहे."
संजय मंडलिकांवर विरोधकांची टीका
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केलेल्या विधानावर शरद पवार म्हणाले की, "छत्रपती शाहू महाराज हे सेवेचा आदर्श ठेवून काम करत आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करताहेत यावरून विरोधकांची मानसिकता काय आणि ते कोणत्या पातळीपर्यंत जाऊ शकतात हे दिसतेय."










