Praful Patel : "शरद पवार म्हणतात ते खरं आहे, मला 2004 पासून भाजपसोबत...", पटेलांचा 'ट्वीट'बॉम्ब

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sharad pawar big revealation praful patel reply yes i wanted alliance with bjp since 2004 maharashtra politics
शरद पवारांनी प्रफुल पटेलांबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता.
social share
google news

Praful Patel Reply Sharad Pawar : '2004 पासून प्रफुल पटेल भाजपबरोबर जाण्यास आग्रही होते', असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar)  यांनी एका मुलाखतीत केला होता. पवारांच्या या गौप्यस्फोटावर आता प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी उत्तर दिले आहे.  ''होय, मी 2004 सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान व त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो', असे प्रफुल पटेल यांनी सांगितले आहे.  (sharad pawar big revealation praful patel reply yes i wanted alliance with bjp since 2004 maharashtra politics)

प्रफुल पटेल यांचं ट्विट जशाच तसं

''होय, मी 2004 सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान व त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी व जनतेसाठी चांगले काम करून पवार साहेब आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा सन्मान वाढविण्याच्या दृष्टीने मी सतत प्रयत्न केले.

हे देखील खरे आहे की, 1999 मध्ये कॉंग्रेसमध्ये सतत अपमान होत असल्यामुळे कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना पवार साहेबांना करावी लागली. तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. आणि हे ही तितकेच खरे आहे की, 2004 मध्ये कॉंग्रेसने आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद नाकारले. साहेब, तुमच्याबद्दलचा आदर कायम आहे!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : "निवडणुकीनंतर तुम्हीच मुख्यमंत्री", भुजबळांना कुणी दिलेली ऑफर?

शरद पवारांचा गौप्यस्फोट 

शरद पवार यांनी लोकसत्ता लोकसंवाद कार्यक्रमात मुलाखत दिली होती. या मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी प्रफुल पटेलांबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. 2004 पासून प्रफुल पटले भाजपबरोबर जाण्यास आग्रही होते. मी काही राजकीय चुका केल्या, असे प्रफुल पटेल म्हणतात. पण  भापजने 2004 च्या निवडणुकीत इंडिया शायनिंगचा प्रचार सुरु केला. तेव्हापासूनच प्रफुल पटेल हे भाजपबरोबर जाण्यासाठी माझ्याकडे आग्रही होते.

पण तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल आदर असला तरी मते मिळणार नाहीत हे मी त्यांना वारंवार सांगत होतो. पाहिजे तर तुम्ही जा हे मी त्यांना सांगितले तेव्हा पटेल यांच्या डोळ्यात पाणी आले होते, असा अनुभव देखील पवार यांनी सांगितला होता. शेवटी मी सांगत होतो तसाच निकाल लागला. काँग्रेसबरोबर जाण्यास प्रफुल पटेल यांनी विरोध केला तरीही यूपीए सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने मी त्यांच्याकडे नागरी हवाई उड्डाण खाते सोपविले होते हे पवारांनी आवर्जुन सांगितले. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : पूनम महाजनांचं तिकीट कापलं, कारण...फडणवीसांनीच सांगितलं काय घडलं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT