Chhagan Bhujbal : "निवडणुकीनंतर तुम्हीच मुख्यमंत्री", भुजबळांना कुणी दिलेली ऑफर?
Chhagan Bhujbal Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांनी केलेल्या विधानावर बोलताना एक मोठा खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

छगन भुजबळ यांचा मोठा खुलासा

शरद पवारांच्या विधानावर भुजबळ काय बोलले?

2004 मध्ये काय घडलं होतं?
Chhagan Bhujbal on Sharad Pawar Statement : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी इतिहासातील राजकीय घडामोडींबद्दल बोलताना एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केला आहे. 'भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं, तर पक्ष फुटला असता', असं विधान शरद पवारांनी केलं. त्याला उत्तर देताना भुजबळांनी वेगळीच स्टोरी सांगितली. वाचा नेमकं भुजबळ काय म्हणाले? (Chhagan Bhujbal said that Congress had offered me the post of Chief Minister of Maharashtra)
'२००४ मध्ये आमच्या सर्वात जास्त जागा आल्या. मात्र, अजित पवार नवखे होते, त्यांना मुख्यमंत्री करता येत नव्हतं. छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं असतं, तर भविष्यात पक्ष फुटला असता', असं विधान शरद पवार यांनी लोकसत्ता वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले.
शरद पवारांच्या विधानावर भुजबळ काय म्हणाले?
याबद्दल बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, 'मी पण ते वाचलं आहे. मला त्याचा पूर्ण काही उलगडा झाला नाही. ज्यावेळी १९९५ मध्ये आमचं सरकार गेलं. शरद पवारांनीच मला विधान परिषद आमदार केलं आणि नंतर विरोधी पक्षनेता केलं."
"त्यावेळच्या पाच वर्षांच्या काळामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून मी शिवसेना-भाजप सरकारच्या विरोधात जे काम केलं, ते इतकं की माझ्या घरावर हल्ला झाला होता. जीवघेण्या हल्ल्यातून मी वाचलो होतो. त्यावेळी सुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो."