Lok Sabha election 2024 : शरद पवारांनी सातारा, रावेरच्या उमेदवारांची केली घोषणा

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

सातारा लोकसभा मतदारसंघातून कोण कोण आहेत इच्छुक?
एकापेक्षा जास्त जण लढण्यास उत्सुक आहेत, असे पवार साताऱ्यात बोलताना म्हणाले.
social share
google news

Sharad Pawar's NCP Lok Sabha Candidates : सातारा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार कुणाला उतरवणार याचा सस्पेन्स अखेर संपला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे यांना उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा केली असून, श्रीराम पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. (Shashikant shinde's name declared by ncp sharad pawar party for satara lok Sabha)

सातारा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला दिली जाऊ शकते, अशी चर्चा मध्यतंरी रंगली होती. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळू शकते, असेही म्हटले जात होते. मात्र, राष्ट्रवादीच्या चिन्हावर पृथ्वीराज चव्हाण यांनी लढवण्यास नकार दिल्यानंतर शरद पवारांनी पक्षातीलच नेत्याला उमेदवारी दिली आहे. 

उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे

सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली जाणार, असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच शरद पवारांकडून उमेदवाराची चाचपणी सुरू होती. काही नावांवर चर्चा केल्यानंतर विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत होणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> 'ठाणे भाजपसाठी महत्त्वाचे', फडणवीसांचे विधान, शिंदेंची सेना अस्वस्थ 

 

रक्षा खडसेविरुद्ध श्रीराम पाटील

रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली असून, पवारांनी उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> महायुतीच्या 20 ते 17 जागा 'डेंजर झोन'मध्ये, 'मविआ' मारणार मुसंडी! 

श्रीराम पाटील हे जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक असून, अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहेत. श्रीराम पाटील यांना उमेदवारी देऊन पवारांनी रावेरमध्ये मराठा कार्ड खेळले असल्याचे म्हटले जात आहे. कारण या मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या जास्त आहे. 

ADVERTISEMENT

श्रीराम पाटील यांची श्री साईराम प्लास्टिक अण्ड ईरिगेशन ही कंपनी आहे. त्याचबरोबर सिका या इलेक्ट्रिक टू व्हिरलरचे उत्पादकही आहेत. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT