Thane Lok Sabha : 'ठाणे भाजपसाठी महत्त्वाचे', फडणवीसांचे विधान, शिंदेंची सेना अस्वस्थ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra Chief Minister Eknath Shinde (C) with Deputy Chief Minister Devendra Fadnavis (L) and Deputy Chief Minister Ajit Pawar (R).
social share
google news

Thane Lok Sabha election 2024 : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा ज्या जागांवरून अडला आहे, त्यात एक जागा आहे ठाणे! हाच ठाणे लोकसभा मतदारसंघावर आपल्याकडे घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिदेंचे वर्चस्व पणाला लागले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीमध्ये कुणाला सुटणार, याची उत्सुकता असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाने तर्कवितर्कांना उधाण आले आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

ठाण्यात भाजपच्या विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी ठाणे आणि भाजप कनेक्शन याबद्दल भाष्य केले. त्यामुळेच ठाण्याची जागा भाजपकडे जाणार असल्याच्या चर्चेला बळ मिळालं आहे. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

"हा जो काही ठाणे विभाग आहे, भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय जुनं इथं आहे. अर्थातच आपले मित्रपक्ष देखील आपल्यासोबत वारंवार राहिलेले आहेत. पण, भारतीय जनता पक्षाचं काम सातत्याने मजबुतीने याठिकाणी वाढलेलं आहे. संपूर्ण ठाणे विभागात भारतीय जनता पक्ष एक प्रमुख पक्ष म्हणून या ठिकाणी पाहायला मिळतो. सगळी आपले कार्यकर्ते पाहायला मिळतात." 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> शरद पवारांनी सातारा, रावेरच्या उमेदवारांची केली घोषणा

"विविध निवडणुकांत आपल्याला चांगलं यश मिळतं. ठाणे विभागातील जी काही सगळी जनता आहे, ती अतिशय ताकदीने आपल्या पाठिशी आहे. या ठाणे विभागातील ज्येष्ठ नेते, आमदार हे आपल्या पक्षात आहेत."

"त्याच्यामुळे मला असं वाटतं की, एकप्रकारे ठाणे विभाग जो आहे, हा भारतीय जनता पक्षाकरिता एक महत्त्वाचा विभाग आहे. आणि या सगळ्या विभागामध्ये आपलं काम सातत्याने वाढतंय आणि भविष्यातही ते वाढणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, अशा प्रकारचं सुसज्ज कार्यालय असणं अत्यंत महत्त्वाचं आहे."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> अमित शाहांच्या 'त्या' भेटीमध्ये नेमकं काय घडलं?, राज ठाकरेंनी स्वत: सांगितलं!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील राजकारणात भाजपच्या ताकदीचाच घोषवारा समोर ठेवला. महत्त्वाचं म्हणजे हा विभाग भाजपसाठी महत्त्वाचा असून, भविष्यात काम या विभागात वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाचा अर्थ राजकीय विश्लेषण आणि स्थानिक राजकारणात ठाण्याची जागा भाजप स्वतःकडे घेणार, असा लावला जात आहे. 

ADVERTISEMENT

कल्याण शिंदेंच्या शिवसेनेला, ठाणे भाजपकडे?

गेल्या काही दिवसांपासून ठाणे लोकसभा मतदारसंघाचा पेच वाढला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राहावा म्हणून शिंदेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणे टाळले होते, असे राजकीय वर्तुळातून सांगितले जाते. पण, देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर करत ही कोंडी फोडली आणि ठाण्यावरील भाजपचा दावा अधिक मजबूत केला, अशी चर्चा स्थानिक राजकारणात सुरू आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्येही अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे आता ही जागा अखेरीस कुणाकडे जाणार, हे जागावाटपाची घोषणेनंतरच स्पष्ट होईल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT