Vijay Shivtare : ''झ@$ला बोलतो, इकडे...'', अजित पवारांवर टीका करताना शिवतारेंची शिवराळ भाषा
Vijay Shivtare Criticize Ajit Pawar : साहेबांवर काय बोलतो म्हणजे शिव्या दिल्या..कुठली अश्लाघ्य भाषा, एखादी उपमा जर दिली तर ती कसली अश्लाघ्य भाषा...त्यांना कदाचित माहिती नसेल, मला आतली माहिती आहे. कधी एकदा निवडणूक जवळ येतेय आणि अजित पवारांची आणि शरद पवारांची जीरवतोय, याची लोक वाट बघतायत.
ADVERTISEMENT
Vijay Shivtare Criticize Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. त्यात महायुतीतीमधील शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात बंड करण्याची तयारी सूरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून विजय शिवतारे बेछुटपणे अजित पवारांवर टीका करतायत. जे गरजतात ते बरसत नाही बोलले ना...मग कशाला झ$#&@ला एवढं सगळं बोलतो. इकडे आम्ही माणसं उभी करतो आणि तिकडे आम्ही माणसं उभी करतो, अशा शब्दात शिवतारेंनी अजित पवारांवर टीका केली आहे. (vijay shivatare criticize ajit pawar baramati lok sabha election 2024 eknath shinde sunetra pawar vs supriya sule)
ADVERTISEMENT
विजय शिवतारे आज इंदापूरमध्ये होते. यावेळी त्यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेत विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा टीका केली. काही बोलले तरी...कोणासाठी बोलले? काय बोलले? हे महत्वाचे नाही. अशाप्रकारची भाषा राजकारणात चालते का? तू कसा निवडून येतो हे लोकसभेचे आहे. पण विधानसभेच्या शेवटच्या सभेत अजित पवार काय बोलले? अॅम्ब्युलन्समध्ये मी प्रचार करत होतो. 9 स्टेन टाकले होते. किडनी फेल झाली होती. एवढे मरायला टेकलात मग कशाला प्रचार करता. इतकी घाणेरडी भाषा वापरली. आता निवडणुकीच्या दरम्यान ती मी प्रसारीत करणार आहे, असा इशाराच शिवतारेंनी अजित पवारांना दिला आहे.
हे ही वाचा : ठाकरेंच्या सेनेचे 20 उमेदवार ठरले?, पाहा संपूर्ण यादी!
शिवतारे पुढे म्हणाले, इतक्या खालच्या थराला...साहेबांवर काय बोलतो म्हणजे ठीक आहे ना...साहेबांवर काय बोलतो म्हणजे शिव्या दिल्या..कुठली अश्लाघ्य भाषा, एखादी उपमा जर दिली तर ती कसली अश्लाघ्य भाषा...त्यांना कदाचित माहिती नसेल, मला आतली माहिती आहे. कधी एकदा निवडणूक जवळ येतेय आणि अजित पवारांची आणि शरद पवारांची जीरवतोय, याची लोक वाट बघतायत.
हे वाचलं का?
गरजतात ते बरसत नाही असे ते म्हणाले ना...मग कशाला झ$#&@ला एवढं सगळं बोलतो. इकडे आम्ही माणसं उभी करतो आणि तिकडे आम्ही माणसं उभी करतो, कशाला ब्लॅकमेलिंग करतो, अशा शब्दात विजय शिवतारेंनी अजित पवारांवर चढवला. खिलाडू वृत्तीने बोला ना लढा..आता एकतर मी 100 टक्के जिंकेन नाहीतर अजित पवारांचा खात्मा होईल, असे विजय शिवतारेंनी म्हटले आहे.
हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : ''तिकीटासाठी एकदाही दिल्लीला न जाता...'',
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT