Lok Sabha election 2024 : "असले प्रकार मला चालणार नाही", जयंत पाटलांनी दिला दम

मुंबई तक

Jayant Patil Speech news : जयंत पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झालेल्या एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दम दिला.

ADVERTISEMENT

google news

Jayant Patil Latest News : (स्वाती चिखलीकर, सांगली) "आपण सर्वांनी खूप निवडणुका पहिल्या आहेत; पण निवडणूक सगळ्यात वेगळी आहे. कदाचित ही निवडणूक आपल्या देशासाठी शेवटची निवडणूक राहील", असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगलाच दम दिला.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथे महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या काळात विरोधकांपासून दूर राहण्यास सांगितले. 

जयंत पाटील मेळाव्यात काय बोलले?

जयंत पाटील म्हणाले, "सत्यजित पाटील सरुडकर हे नवा उमेदवार मशाल चिन्हावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर आलेला आहे. आपण सर्वांनी घासून पुसून काम करायचं आहे."

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे म्हणाले, "तुमच्या घरी कोण येऊन चहा घेऊन गेलं. असले प्रकार मला चालणार नाही. ते आले. घरात बसले, आम्ही काय करू? तसला धंदा जरा बंद करा. अचानक आले."