Lok Sabha Elections 2024 : 'मविआ'ची 'वंचित'सोबतची आघाडी फिस्कटली?

विक्रांत चौहान

ADVERTISEMENT

Maha vikas Aghadi Vanchit Bahujan Aghadi alliance Latest Update : महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, आता ही आघाडी होण्याची शक्यता मावळताना दिसत आहे.

social share
google news

Maha Vikas Aghadi Vanchit Bahujan Aghadi Latest News : महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी नसेल, हे स्पष्ट होताना दिसत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी 27 मार्चपर्यंतचा वेळ दिलेला असताना आज शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी जे विधान केले, त्यातून वंचित बहुजन आघाडी आणि मविआ लोकसभा निवडणुकीत एकत्र नसणार असं दिसत आहे. (Vanchit Bahujan Aghadi Alliance with Maha vikas Aghadi is Likely to break)

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी संजय राऊत म्हणालेले की, वंचित बहुजन आघाडीमुळे आमची जागावाटपाची घोषणा थांबली आहे. पण, प्रकाश आंबेडकर यांनी अल्टिमेटम दिल्यानंतर संजय राऊत काय म्हणाले ते जाणून घ्या... 

राऊत म्हणाले की, "आमची पहिली यादी उद्या म्हणजे मंगळवारी जाहीर करू." याचा अर्थ आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत येण्याची चिन्हे मविआतील मित्रपक्षांना दिसत नाहीये. 

हे वाचलं का?

राऊत वंचित बहुजन आघाडीबद्दल काय बोलले?

आता वंचितसोबत आघाडी करण्याबद्दल राऊतांनी काय विधान केलं, तेही पहा. राऊत म्हणाले की, "प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत. ते आमच्यासोबत राहावेत, अशी आमची इच्छा आहे. कालही हाच प्रयत्न होता, आजही आणि उद्याही राहील. पण, आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. आता तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही, हे आता त्यांच्यावर अवलंबून आहे."

हेही वाचा >> तुमच्या मतदारसंघात अशी होणार लढत, पाहा उमेदवारांची यादी

"महाविकास आघाडीमध्ये चार-पाच पक्ष आहेत. तर सगळ्यांना हिस्सा मिळायला हवा. वंचितला आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. मला वाटतं तो प्रस्ताव चांगला आहे. ज्या जागा आंबेडकरांनी मागितल्या होत्या. त्याच आम्ही त्यांना दिलेल्या आहेत", असे संजय राऊत म्हणाले. 

चार जागांच्या प्रस्तावाबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणालेले की, "चार जागा मी महाविकास आघाडीला परत करतोय." प्रकाश आंबेडकरांची मागणी पाच ते सहा जागांची आहे. त्यावर ते अडून असून, महाविकास आघाडी त्यांना इतक्या जागा देईल यांची शक्यता जवळपास संपलेली आहे. 

ADVERTISEMENT

या गोष्टी ठरल्या कळीच्या...

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील मित्रपक्षाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. ज्यावर मविआच्या नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. दुसरा मुद्दा म्हणजे आंबेडकर सुरुवातीपासून वेगवेगळ्या अटी घालताना दिसले. म्हणजे कोठून कुणाला उमेदवारी द्यावी, किमान समान कार्यक्रमावर सहमती द्यावी, निवडणूक निकालानंतर भाजपसोबत जाणार नाही, हे शपथपत्र द्यावं आदी.

त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी सुरूवातीला काँग्रेसला कात्रीत पकडले. नाना पटोले यांच्या स्वाक्षरीने वंचित बहुजन आघाडीचा मविआत समावेश आपण मानत नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे किंवा चेन्नीथला यांनी घोषणा करावी, असे ते म्हणालेले.

हेही वाचा >> उमेदवारी मिळताच धानोरकरांनी मुनगंटीवारावर चढवला हल्ला 

नंतर आंबेडकरांनी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरून विश्वास उडत असल्याचे सांगितले आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी स्वतंत्र प्रस्ताव दिला. काँग्रेसला सात मतदारसंघांमध्ये पाठिंबा देणार अशी ऑफर आंबेडकरांनी दिली. ज्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष नाराज झाल्याचे दिसले, ते संजय राऊत यांनी वेळोवेळी मांडलेल्या भूमिकामधून दिसली. आता आंबेडकर यांनी अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरण्याचीही घोषणा केली आहे. त्यामुळे वंचित मविआसोबत जाणार नाही, याचीच शक्यता अधिक गडद झाली आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT