Prakash Ambedkar : 'मविआ'ला आंबेडकरांचा अल्टिमेटम! महाराष्ट्रात गणित बदलणार
Prakash Ambedkar Latest News : प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवणार अशीच स्थिती सध्या दिसत आहे.
ADVERTISEMENT
Prakash Ambedkar Latest News : प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवणार अशीच स्थिती सध्या दिसत आहे.
Maharashtra Lok Sabha Election 2024 : काँग्रेसकडून काही मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पण, महाविकास आघाडीतील जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. कारण वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार आहे की, नाही; हे कोड अजूनही सुटलेले नाही. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई Tak ला मुलाखत दिली. (Prakash Ambedkar Said That Maha vikas aghadi Wasn't give offer to Four seats to vanchit bahujan aghadi)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडीला अखेरचा अल्टिमेटम दिला आहे. वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे, असा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे, तो प्रकाश आंबेडकर यांनी फेटाळून लावला आहे.
मविआने तीन जागांचाच प्रस्ताव दिल्याचे आंबेडकरांनी म्हटले आहे. पाच जागांची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली असून, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीला २७ मार्चपर्यंतचा वेळ दिला आहे.
हे वाचलं का?
तोपर्यंत निर्णय न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत आंबेडकरांनी दिले आहेत. असे झाल्यास राज्यातील लोकसभा निवडणुकीची समीकरणे पूर्णपणे बदलून जाणार आहेत. (आंबेडकर काय म्हणालेत बघा व्हिडीओ)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT