Rahul Kaswan : भाजपला बसणार आणखी एक धक्का! विद्यमान खासदार काँग्रेसमध्ये करणार प्रवेश!

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

राहुल कासवानचे वडील राम सिंह हे भाजपचे खासदार आणि चुरूचे आमदार होते..
भाजप खासदार राहुल कासवान सोमवारी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बृजेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये केला प्रवेश

point

त्यांच्यानंतर राहुल कासवानही काँग्रेसच्या वाटेवर

point

लोकसभा निवडणुकीआधी पक्षांतराला वेग

BJP MP Rahul Kaswan Likely join to congress : भारतीय जनता पक्षाने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली. त्यात काही विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली. ज्या खासदारांची तिकिटे कापली गेली, त्यापैकी बहुतांश खासदारांनी पक्षाचा निर्णय मान्य केला, पण एक खासदार असाही होता ज्याने तिकीट कापताच बंडखोरी केली. तो खासदार आहे राजस्थानतील चुरूचे लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेले राहुल कासवान, जे आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. (Rahul Kaswan is likely to join Congress.)

ADVERTISEMENT

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप खासदार राहुल कासवान सोमवारी दिल्लीत काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात आणि आगामी लोकसभा निवडणूक चुरूमधून काँग्रेसच्या तिकिटावर लढवू शकतात. 

कासवान यांनी भाजपला केला होता सवाल

तिकीट कापण्यात आल्यानंतर खासदार राहुल कासवान यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ‘माझा गुन्हा काय होता?’ असा सवाल सोशल मीडियावरून भाजप नेतृत्वाला केला होता. भाजपने या जागेवरून दोन वेळा सुवर्णपदक आणि एकदा पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारे देवेंद्र झाझरिया यांना उमेदवारी दिली आहे.

हे वाचलं का?

पोस्टमधून व्यक्त केली नाराजी

एक्सवरील एका पोस्टमध्ये कासवान यांनी लिहिले होते की, "माझा गुन्हा काय होता? मी प्रामाणिक नव्हतो का? मी कष्टाळू नव्हतो का? मी विश्वासू नव्हतो का? मी कलंकित होतो? काम पूर्ण करण्यात मी कोणतीही कसर सोडली का? पंतप्रधानांच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीत मी आघाडीवर होतो. अजून काय हवे होते? मी जेव्हा जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा सगळेच थक्क व्हायचे. याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही."

कासवान यांना राजकीय वारसा

राहुल कासवान यांचे वडील राम सिंह हे भाजपचे खासदार आणि आमदार राहिलेले आहेत. त्यांची आई कमला कासवान या सादुलपूरमधून भाजपच्या आमदार आहेत. राहुल कासवान यांच्या शिवाय भाजपने इतरही काही जणांची तिकिटे कापली आहेत.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ठाकरेंसोबतची निष्ठा विसर्जित, वायकरांची शिंदेंच्या सेनेत एन्ट्री! 

राजस्थानमधील विद्यमान खासदारांमध्ये रंजिता कोळी (भरतपूर), देवजी पटेल (जालोर), अर्जुन लाल मीना (उदयपूर) आणि कनकमल कटारा (बंसवाडा) यांचा समावेश आहे. मात्र, पक्षाने राज्यातील लोकसभेच्या 10 जागांसाठी अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT