Salman Khan : सलमान खानला सर्पदंश! पनवेलमधील फार्म हाऊसवर रात्री घडली घटना

सापाने चावा घेतल्यानंतर कामोठेतील रुग्णालयात करण्यात आलं होतं दाखल...
Salman Khan : सलमान खानला सर्पदंश! पनवेलमधील फार्म हाऊसवर रात्री घडली घटना
अभिनेता सलमान खान

ख्रिसमस आणि नववर्षांच्या सेलिब्रेशनसाठी पनवेल येथील फार्म हाऊसवर गेलेल्या अभिनेता सलमान खानसोबत मोठी घटना घडली. सलमान खान शनिवारी मध्यरात्री सर्पाने दंश केल्याची माहिती समोर आली. फार्म हाऊसमध्येच ही घटना घडली असून, त्यानंतर सलमान खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या सलमानची प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अभिनेता सलमान खान शनिवारी पनवेलमधील त्याच्या फार्म हाऊस होता. मध्यरात्री फार्म हाऊसमध्ये त्याला सापाने चावा घेतला. सलमान खानला दंश करणारा साप विषारी नसल्याने मोठी भीती दूर झाली. मात्र, त्यानंतर तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं.

सलमान खानला नवी मुंबईतील कामोठे परिसरात असलेल्या एमजीएम रुग्णालयात मध्यरात्री दाखल करण्यात आलं. सलमानवर डॉक्टरांनी तातडीने उपचार केले. त्यानंतर आता सलमान खानची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मध्यरात्री 3 वाजता सलमान खानला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार केल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, सकाळी 9 वाजता सलमान खान पुन्हा पनवेलमधील फार्म हाऊसवर परतला. सध्या तो विश्रांती घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सलमान खानचं पनवेलमध्ये फार्म हाऊस असून, सर्व प्रकारच्या सोयीसुविधा त्या ठिकाणी आहेत. लॉकडाउनच्या काळात सलमान खान फार्म हाऊसवर राहायला होता. या फार्म हाऊस सलमान खानची छोटी बहीण अर्पिताचं नाव आहे. अर्पिता फार्म असं नाव गेटवरच लिहिलेलं आहे.

salman khan/instagram
salman khan/instagram

इथे स्वतंत्र जिम आहे. त्याचबरोबर घोडस्वारीसाठी ट्रॅकही तयार केलेला आहे. फार्म हाऊसला लागूनच शेती आहे. शेतात काम करतानाचे फोटोही सलमान खान नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतो.

फार्म हाऊस परिसरातच एक मोठी बागही आहे. त्याचबरोबर एक मोठा स्वीमिंग पूलही तयार केलेला आहे. सुटी घालवण्यासाठी सलमान खान नेहमी फार्म हाऊसवर येत असतो. वाढदिवस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सलमान खान फार्म हाऊस आलेला असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in