बॉलिवूडमध्ये अजय देवगणला झाली ३० वर्ष पूर्ण,अक्षय कुमार,अनिल कपूरनी दिल्या हटके शुभेच्छा

मुंबई तक

बॉलिवूडचा सिंघम म्हणजे अजय देवगणला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. १९९१ मध्ये अजय देवगणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अजय पहिल्या चित्रपटापासून ते आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘ फूल और कांटें’ या पहिल्या चित्रपटातून अजयने बाईकवरून धमाकेदार स्टंट करून एंट्री घेतल्यावर लोकांमध्ये तो खूप लोकप्रिय झाला होता. आज अजय देवगणच्या बॉलिवूडमधील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बॉलिवूडचा सिंघम म्हणजे अजय देवगणला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. १९९१ मध्ये अजय देवगणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अजय पहिल्या चित्रपटापासून ते आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘

फूल और कांटें’ या पहिल्या चित्रपटातून अजयने बाईकवरून धमाकेदार स्टंट करून एंट्री घेतल्यावर लोकांमध्ये तो खूप लोकप्रिय झाला होता. आज अजय देवगणच्या बॉलिवूडमधील या प्रवासाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्त बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि अनिल कपूर यांनी अजय देवगणला सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमारने शुभेच्छा देताना म्हटलं आहे की मला आठवतंय जेव्हा आपण दोघेही न्यूकमर होतो तेव्हा आपण जुहू बीचवर मार्शल आर्टसची प्रॅक्टिस करायचो. आणि तेव्हा तुझे वडिल आपल्याला ट्रेनिंग द्यायचे. काय मस्त दिवस होते यार ते… आज तुझा फूल और काँटे हा सिनेमा रिलीज होऊन ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. मित्रा तुला खूप खूप शुभेच्छा

तर दुसरीकडे अनिल कपूरने अजय देवगणला शुभेच्छा देताना म्हटलं आहे की .. मला आठवतंय फूल ओैर काँटेच्या प्रिमियरला ३० वर्षांपूर्वी मी आलो होतो, थिएटरमध्ये सिनेमाला सुरवात झाली तुझे क्लोजअप,तुझे बोलके डोळे,संयत अभिनय हे पाहून मला तेव्हाच कळलं की तु मोठा स्टार होणार..

अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ‘बाहुबली’ दिग्दर्शक राजामौलीच्या दिग्दर्शित ‘आरआरआर’ चित्रपटात अजय दिसणार आहे. ७ जानेवारी प्रदर्शित होण्यासाठी हा चित्रपट सज्ज आहे. तसेच संजय लीला भंसाळीचा ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘मई डे’, ‘मैदान’, ‘थँक गॉड’ मध्ये अजय देवगण दिसणार आहे. शिवाय अजय देवगणचा ‘दुष्यम २’ सध्या प्री-प्रोडक्शनाच्या स्टेजमध्ये आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp