अक्षय आणि प्रियांकाचं 17 वर्षानंतर गाणं रिलीज; 2005 साली शूटिंग झालेलं गाणं त्यावेळी रिलीज न होण्याचं कारण काय?

प्रियांका आणि अक्षयनं 'बरसात' चित्रपटासाठी हे गाणं शूट केलं होतं, मात्र नंतर अक्षयने चित्रपट सोडला होता.
After 17 years akshay and Priyanka’s song released
After 17 years akshay and Priyanka’s song released

अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांनी 'ऐतराज' आणि 'मुझसे शादी करोगी' सारख्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. पण 'वक्त' नंतर दोन्ही स्टार्सनी पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर केली नाही. आता या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचे एक गाणे आले आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे 2005 मध्ये शूट झालेलं हे गाणं तब्बल 17 वर्षांनंतर रिलीज झालं आहे. 'वो पहली बरसात' असे या गाण्याचे टायटल आहे. प्रियांका आणि अक्षयने 'बरसात' चित्रपटासाठी हे गाणे शूट केले होते, मात्र नंतर अक्षयने चित्रपट सोडला होता. यानंतर दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी बॉबी देओलला मुख्य भूमिकेत घेऊन चित्रपट बनवला होता.

हे गाणं कुमार सानूने गायले होते

बॉलीवूड चाहत्यांना 'बरसात' चित्रपटाचा टायटल ट्रॅक आठवत असेल, ज्याचे बोल 'बरसात के दिन आए' ने सुरू होतात. बॉबी देओल आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं कुमार सानू यांनी गायले आहे, ज्यांना मेलडीचे मास्टर मानले जाते. या गाण्यात मूळ जोडी प्रियांका आणि अक्षयची होती. अक्षयने चित्रपट सोडल्यानंतर बॉबी देओल चित्रपटात आला.

एकाच सेटवर दोन्ही गाण्याचे शूटिंग

गाण्याचे दोन्ही व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की, दोन्ही वेळा गाणे एकाच ठिकाणी आणि सेटिंगमध्ये शूट करण्यात आले आहे. मात्र, अक्षय ज्या व्हिडिओमध्ये आहे, त्यात प्रियांकाने ऑफ व्हाइट कलरचा स्लीव्हलेस शॉर्ट कुर्ती आणि चुरीदार घातला आहे. बॉबी देओलसोबत व्हिडिओमध्ये प्रियांकाचा ड्रेस निऑन ग्रीन आहे.

यामुळे अक्षयने चित्रपट सोडला होता

नुकतेच बॉक्स ऑफिसवर वर्ल्डवाइड संवाद साधताना दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी या गाण्याबद्दल आणि चित्रपटाबद्दल चर्चा केली होती. त्याने सांगितले होते की अक्षय आणि प्रियांकाने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती आणि दोघांनी एकत्र टायटल ट्रॅक देखील शूट केला होता. पण अक्षयला या दरम्यान त्याच्या काही 'कौटुंबिक समस्या' सोडवाव्या लागल्या.

अक्षयसाठी ही अडचण मोठी होती, अन्यथा त्याने चित्रपट अशाप्रकारे कधीच सोडला नसता, असे सुनीलने म्हटले होते. रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की, त्या दिवसांमध्ये अक्षय आणि प्रियांकाच्या जवळीकतेबद्दल अनेक अफवा येऊ लागल्या होत्या, त्यामुळे ट्विंकल खन्नाने अक्षयला चित्रपटात काम न करण्यास सांगितले होते.'बरसात' सोडण्यामागचे खरे कारण काय होते हे फक्त अक्षयच सांगू शकतो. पण 'वो पहली बरसात' या गाण्याने चाहत्यांसाठी अक्षय आणि प्रियांकाची जोडी पडद्यावर पाहण्याची उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in