‘टॉयलेट साफ करण्यासापासून ते…’; अमिताभ बच्चन यांना करावी लागताहेत सर्वच कामं
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. बिग बी सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना सतत अपडेट्स देत असतात. बच्चन यांनी आता एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे बिग बींनी सांगितले की, त्यांना कोविडमध्ये कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्वतःलाच करावी लागत आहे सर्वच कामं अमिताभ […]
ADVERTISEMENT

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. बिग बी सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना सतत अपडेट्स देत असतात. बच्चन यांनी आता एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे बिग बींनी सांगितले की, त्यांना कोविडमध्ये कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
स्वतःलाच करावी लागत आहे सर्वच कामं
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नवीन ब्लॉगमध्ये कोविडमध्ये येणाऱ्या समस्यांचा उल्लेख केला आहे. बिग बींच्या ब्लॉगनुसार, नवीन स्टाफला गोष्टी समजावून सांगणे कठीण जात आहे. यामुळेच अमिताभ बच्चन यांना त्यांची सर्व कामे स्वत: करावी लागत आहेत. बच्चन लिहितात, कोविड झाल्यानंतर मी माझी सर्व कामे स्वत: करत आहे. मी कपडे धुण्याचे काम करतो. मी फरशी साफ करत आहे. मी स्वतः टॉयलेट साफ करत आहे, अशी माहिती त्यांनी दिलीय.
बिग बी पुढे लिहितात की मीच सर्व स्विच चालू आणि बंद करत आहे. चहा आणि कॉफी बनवत आहे. मी फोनवर बोलत ही सगळी कामं करत आहे. यावेळी बिग बींकडे एकही परिचारिका नाही. त्यामुळे त्यांना त्यांची औषधे स्वतःच घ्यावी लागत आहे.