जबरदस्त फिटनेस तरीही गायक KK कसे ठरले कार्डियक अरेस्टचा बळी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: प्रसिद्ध गायक केके यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. कोलकाता येथे एका लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान केकेची तब्येत अचानक बिघडली. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच केके यांच्या मृत्यूचे खरे कारण कळणार आहे, परंतु डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

कार्डियाक अरेस्टमध्ये हृदय अचानक काम करणं बंद करतं. वयाच्या 53व्या वर्षीही केके पूर्णपणे तंदुरुस्त आणि तरुण दिसत होते. अशा परिस्थितीत केके यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. शोदरम्यानच केके यांना छातीत वेदना आणि अस्वस्थता जाणवू लागली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेत असतानाचा केके यांचा मृत्यू झाला.

तरुण ठरत आहेत हृदयविकाराचे बळी

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

केके यांच्या आधीही अनेक सेलिब्रिटींना कमी वयात हृदयविकाराचा झटका आला आहे. गेल्या वर्षी 29 ऑक्टोबरला साऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमार याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्याचे वयही अवघे 46 वर्ष होते. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचेही गेल्या वर्षी 2 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होत्या. 40व्या वर्षी त्याच्या मृत्यूनेही सर्वांना धक्का बसला होता.

मुळात इतके फिट दिसणार्‍या लोकांनाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो यावर लोकांचा विश्वास बसत नाही. तथापि, आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की तंदुरुस्त शरीराचा अर्थ असा नाही की तुमचे हृदय देखील पूर्णपणे निरोगी आहे.

ADVERTISEMENT

का अचानक येतो कार्डियक अरेस्ट?

ADVERTISEMENT

अचानक कार्डियक अरेस्टमुळे हृदय काम करणं थांबवतं, श्वास घेण्यास त्रास होतो आणि व्यक्ती बेशुद्ध होतो. ही स्थिती हृदयाच्या विद्युत व्यवस्थेतील बिघाडामुले उद्भवते. त्यामुळे हृदयाची पंपिंग क्रिया विस्कळीत होऊन शरीरातील रक्तप्रवाह थांबतो. कार्डियक अरेस्ट हा हृदयविकारापेक्षा वेगळा असतो.

हृदयविकाराच्या झटक्यामध्ये हृदयाच्या एका भागापर्यंत रक्त पोहोचणे थांबते, तर कार्डियक अरेस्टमध्ये हृदय अचानक काम करणे थांबवतं.

कार्डियक अरेस्टची लक्षणं-

कार्डिअॅक अरेस्टची काही खास लक्षणे आहेत. जसे की अचानक कोलमडणे, नाडीचे ठोके कमी होणे, धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, मूर्च्छा येणे, अस्वस्थता, अशक्तपणा जाणवणे, छातीत दुखणे आणि हृदयाचे ठोके अनियमित होणे. पण, अचानक आलेल्या कार्डियक अरेस्टची लक्षणे दिसत नाहीत.

बत्रा हार्ट सेंटरचे चेअरमन आणि डॉ उपेंद्र कौल यांच्याशी केलेल्या विशेष चर्चेदरम्यान त्यांनी हृदयविकार आणि कार्डियक अरेस्टशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. डॉ उपेंद्र यांच्या म्हणण्यानुसार वयाच्या 35-40 व्या वयातील लोकांसोबत अशा घटना अधिक पाहायला मिळत आहेत. त्यांनी त्यातील काही जोखीम घटकही सांगितले आहेत.

1. सिगारेट ओढणे

2.खराब कोलेस्ट्रॉल

3. उच्च रक्तदाब

4. मधुमेह

5. मानसिक ताण

6. व्यायाम न करणं

7. लठ्ठपणा

8. फार कमी भाज्या आणि फळे खाणे

9. दारुचं सेवन

KK : कधी सेल्समनची नोकरी, तर कधी रेडिओ जिंगल्स, रसिकांना वेड लावणाऱ्या केकेचा असा होता स्ट्रगल?

हे 9 प्रमुख घटक आहेत ज्यामुळे 90% कार्डियाक अरेस्ट किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. यापैकी दोन किंवा अधिक जोखीम घटक असण्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

हृदयविकाराची लक्षणे असलेल्या लोकांनी कोणती खबरदारी घ्यावी?

डॉक्टर उपेंद्र म्हणाले, ‘प्रत्येक व्यक्तीने त्याची वार्षिक तपासणी केली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने त्यांचा रक्तदाब, साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियमितपणे तपासली पाहिजे. जर ते जास्त असेल तर ताबडतोब उपचार सुरू केले पाहिजेत. रक्तदाब 130-80 पेक्षा कमी असल्यास चांगले. कोलेस्ट्रॉल कमी असेल आणि साखरही कमी असेल तर उत्तम. असे आजार टाळण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. सायकल चालवणे असो किंवा वेगाने धावणे तसेच दररोज 30 ते 40 मिनिटे व्यायाम करणे फार महत्वाचं आहे.’

जास्त व्यायामामुळे वाढतो धोका-

गरजेपेक्षा जास्त व्यायाम करणंही धोकादायक ठरु शकतं. जर एखादी व्यक्ती संपूर्ण महिनाभराचा व्यायाम 1 दिवसात करत असेल तर ती काही चांगली गोष्ट नाही. व्यायाम नियमित असावा, तो किती असावा, हे त्या व्यक्तीच्या जोखीम घटकावर अवलंबून असते. जर तो वयाच्या 50 किंवा 55 व्या वर्षी प्रथमच व्यायाम करत असेल तर त्याने सामान्य वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि याबाबत तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT