लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्मृतीदिनी बेर्डे कुटुंबियांनी केली मोठी घोषणा, लक्ष्या मामाचं स्वप्न करणार पूर्ण
लक्ष्मीकांत बेर्डे हे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचं लाडकं व्यक्तिमत्व. १६ डिसेंबर २००४ साली लक्ष्मीकांत बेर्डेंचं अकाली निधन झालं. तेव्हा संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी,नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली होती. मराठी सिनेमा,त्यातील कलाकार, तंत्रज्ञ यांना नेहमीच भक्कमपणे मदत करण्याचे काम लक्ष्मीकांत बेर्डेंनी नेहमीच केली होती. त्यांचं हे कार्य अविरत सुरू राहावं यासाठी बेर्डे कुटुंबियांनी त्यांच्या १७ व्या स्मृतीदिनी एक महत्वाचा निर्णय […]
ADVERTISEMENT

लक्ष्मीकांत बेर्डे हे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचं लाडकं व्यक्तिमत्व. १६ डिसेंबर २००४ साली लक्ष्मीकांत बेर्डेंचं अकाली निधन झालं. तेव्हा संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी,नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली होती. मराठी सिनेमा,त्यातील कलाकार, तंत्रज्ञ यांना नेहमीच भक्कमपणे मदत करण्याचे काम लक्ष्मीकांत बेर्डेंनी नेहमीच केली होती. त्यांचं हे कार्य अविरत सुरू राहावं यासाठी बेर्डे कुटुंबियांनी त्यांच्या १७ व्या स्मृतीदिनी एक महत्वाचा निर्णय घेत एक मोठी घोषणा केली आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे आणि त्यांची मुलं अभिनय आणि स्वानंदी बेर्डे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत लक्ष्य कला मंच ची स्थापना केली आहे. या मंचामार्फत महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात असलेल्या कलाकारांना आपलं हक्काचं व्यासपीठ मिळवून देणे, कलाकारांना त्यांचा योग्य तो हक्क मिळवून देणे, उदयोन्मुख कलाकारांना एनएसडी,एफटीआयआयच्या धर्तीवर शास्त्रोक्त पध्दतीने शिक्षण मिळवून देणे अश्या महत्वाच्या गोष्टी या मंचामार्फत राबविल्या जाणार आहेत. अशी माहिती प्रिया बेर्डेंनी मुंबई तकशी बोलताना दिली.
चित्रपटसृष्टीत येऊ पाहणाऱ्यांना काही लोक आर्थिक गोष्टींसाठी फसवतात, काही निर्मात्यांकडून कलाकारांची फसवणूक होते अश्या चुकीच्या गोष्टींना आळा बसावा, हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी लक्ष्य कला मंच भविष्यात प्रयत्न करणार आहे. अनेक चुकीच्या गोष्टींना कायमचं या चित्रपटसृष्टीपासून दूर ठेवण्यासाठी लक्ष्य कला मंच पुढाकाराने कलाकारांना मार्गदर्शन करणार आहे.