अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचं निधन; सरकारी नोकरी सोडून गाठली मुंबई, असा मिळाला पहिला रोल
बॉलिवूड अॅक्टर मिथिलेश चौधरी यांचं निधन झालं आहे. ६८ वर्षीय मिथिलेश चौधरी यांचा हृदयरोगाने त्रस्त होते. त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. मिथिलेश चतुर्वेदी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त होतो आहे. त्यांचे चाहते आणि सहकारी सेलिब्रिटी त्यांच्या आठवणींमध्ये भावूक झाले आहेत. मुंबईत कसे आले होते मिथिलेश चतुर्वेदी? लखनऊमध्ये राहणारे मिथिलेश चतुर्वेदी हे सर्वसामान्य […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अॅक्टर मिथिलेश चौधरी यांचं निधन झालं आहे. ६८ वर्षीय मिथिलेश चौधरी यांचा हृदयरोगाने त्रस्त होते. त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. मिथिलेश चतुर्वेदी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त होतो आहे. त्यांचे चाहते आणि सहकारी सेलिब्रिटी त्यांच्या आठवणींमध्ये भावूक झाले आहेत.
मुंबईत कसे आले होते मिथिलेश चतुर्वेदी?
लखनऊमध्ये राहणारे मिथिलेश चतुर्वेदी हे सर्वसामान्य माणूस होते. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात खूप उशिरा केली. मुंबईत येण्याआधी ते थिएटर आर्टिस्ट म्हणून काम करत होते. तसंच दीर्घकाळ त्यांनी सरकारी कर्मचारी म्हणूनही काम केलं. मिथिलेश चतुर्वेदी यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली होती.
एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मिथिलेश चतुर्वेदी यांनी सांगितलं होतं की त्यांनी त्यांचं सिनेमातलं करिअर काहीसं उशिरा सुरू केलं. मी नाटक करत असे, नाटक करता करता मी देशभरात फिरलो. नद्या असलेली शहरं तर आपण पाहिली आता समुद्र असलेल्या मुंबईत यावं असं वाटलं म्हणून मुंबईत आलो. इथे आल्यानंतर काम मिळवणं खूपच कठीण होतं. पण मी देवाचं नाव घ्यायचो आणि प्रयत्न करायचो, देवाने माझी प्रार्थना ऐकली असं मिथिलेश यांनी सांगितल होतं.
मी थिएटरमध्ये काम करत असतानाच सरकारी नोकरीही करत होतो. जवळपास २५ वर्षे मी सरकारी नोकरी केली. जेव्हा लक्षात आलं की नोकरीशिवायही आपलं भागतं आहे तेव्हा नोकरी सोडली आणि मुंबईला आलो. त्यावेळी मी काहीसा घाबरलोही होतो. पण मला देवावर विश्वास होता असंही मिथिलेश यांनी सांगितलं होतं.