सुष्मिता सेनने ‘सेक्स’ शब्द उच्चारताच… नेमकं काय घडलेलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Actress Sushmita Sen : अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या 'चॅप्टर 2' या युट्यूब चॅनलवर मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीतला एक मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सुष्मिताने सांगितले की, एकदा तिच्या आई-वडिलांनी विचार करून आणि मोजून-मापून बोलण्याचा सल्ला तिला दिला होता. सुष्मिताला तिच्या मनात जे काही आहे ते सर्वांसमोर मनमोकळेपणाने व्यक्त करायला आवडते. ती कोणत्याही भेदभाव किंवा मर्यादांवर विश्वास ठेवत नाही. पण जेव्हा तिने मिस युनिव्हर्स म्हणून करिअरला सुरुवात केली तेव्हा तिला ही गोष्ट अडचणीचे कारण ठरली. (actress sushmita sen tells that incident in rhea chakraborty youtube channel which happend with her when her parents-ask to-not-use-sex-word-in-interviews)

ADVERTISEMENT

रिया चक्रवर्तीला दिलेल्या मुलाखतीत सुष्मिताने याबद्दलचा तिच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. एका मुलाखतीत तिने 'सेक्स' शब्दाचा उच्चार केला होता. त्यावेळी ती 18 वर्षांची होती. यानंतर तिचे आई-वडील नाराज झाले होते. त्यांनी सुष्मिताला या शब्दाचा उच्चार करण्यास मनाईसुद्धा केली होती.

हेही वाचा : New Tax Regime 2024 : नव्या आयकर रचनेमुळे तुम्हाला किती रुपयांचा फायदा होणार?

सुष्मिताने पुढे सांगितले की, त्यावेळी समाज आजच्या काळाप्रमाणे मोकळ्या विचारांचा नव्हता. त्यावेळी सर्व काही 'हौ' होतं. एवढं की माझ्या आई आणि वडिलांनी मला समजावलं होतं की, "तुझ्या खांद्यांवर खूप काही टिकून आहे पण तू जे काही म्हणत आहेस त्यावर आवर घाल. वयाच्या 18व्या वर्षी मुलाखतीत 'सेक्स' हा शब्द का वापरला? शोभा डे तुझ्याबद्दल खूप वाईट लिहित आहे."

हे वाचलं का?

हेही वाचा : Budget 2024: काय स्वस्त, काय महाग... मोदी सरकारने बजेटमधून नेमकं दिलं तरी काय?

सुष्मिताने असेही सांगितले की, 'तिच्या आई-वडिलांनी तिला समजावलेल्या या गोष्टीचा तिला काहीच फरक नाही पडला. कारण एकदा शोभा डे यांच्या मुलाखतीत तिने मुद्दामून सेक्स हा शब्द वापरला होता. सुष्मिता म्हणाली होती, 'मला आठवते की, ते नाव स्पेशली बंगालीमध्ये आले होते. बंगाली लोकांना खूप बौद्धिक मानले जाते. त्यामुळे बौद्धिक लेख हे त्रासदायक असायचे, गॉसिपवाले नसायचे. मला वाटले ठीक आहे. मग मी शोभा डे यांच्यासोबत एक मुलाखत केली आणि त्यावेळी मुद्दाम 'सेक्स' हा शब्द वापरला. मी हा शब्द निवडला कारण मला जे व्हायचे होते ते 'मिस युनिव्हर्स' किंवा 'सर्वात सुंदर व्यक्ती' नव्हते. मला एक स्वतंत्र साक्षर व्यक्ती व्हायचे होते. जो खरोखर स्वतंत्र असेल. त्यामुळे त्या प्रयत्नात मी भारताची पहिली मिस युनिव्हर्स बनले.'

हेही वाचा : Budget 2024 : मोबाईल, चार्जर होणार स्वस्त! अर्थसंकल्पात काय केली घोषणा?

सुष्मिताने 1994 मध्ये पहिली इंडियन मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री शेवटची तिच्या होम प्रोडक्शन वेब सीरिज 'आर्या-अंतिम वार'मध्ये दिसली होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT