Aishwarya Abhishek Divorce Rumours: ''आम्ही दररोज भांडतो'', घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या 'हे' काय बोलून गेली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

aishwarya rai bachchan and abhishek bachchan divorce rumour aishwarya rai we fight every day says in interview bollywood news
घटस्फोटाच्या चर्चा सूरू असताना ऐश्वर्या रायचं (Aishwarya Rai) मोठं विधान समोर आलं आहे. '
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आमच्यात दररोज भांडणे व्हायची

point

ऐश्वर्याने मुलाखतीत सांगितली नात्यातली 'ती' गोष्ट

point

अभिषेक बच्चनने यावर काय प्रतिक्रिया दिली?

Aishwarya Rai Abhishek Bachhan Divorce Rumours : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachhan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सूरू आहे. या घटस्फोटाच्या चर्चा सूरू असताना ऐश्वर्या रायचं (Aishwarya Rai) मोठं विधान समोर आलं आहे. ''आम्ही दररोज भाडतो'' असे विधान ऐश्वर्याने  केले आहे. एका मुलाखतीत ऐश्वर्याने हे विधान केले आहे. त्यामुळे एकच खळबळ मांडली आहे. (aishwarya rai bachchan and abhishek bachchan divorce rumour aishwarya rai we fight every day says in interview bollywood news)  

ADVERTISEMENT

खरं तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दलची एक मोठी गोष्ट सांगितली होती. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यात दररोज भांडणे व्हायची? दोन वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये, अभिषेक आणि ऐश्वर्याने याबाबतची पुष्टी केली होती की त्यांच्यात दररोज भांडणे व्हायची.यावर अभिषेकने आमच्यात जोरदार भांडणे झाले नाही आहेत. हे अधिक मतभेदांसारखे होते, असे सांगितले होते.

हे ही वाचा : Nandurbar Crime : आई, पोटात दुखतंय; डॉक्टरांकडे जाताच बापाचं पितळ उघडं पडलं, नेमकं काय घडलं?

2010 मध्ये वोग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, ऐश्वर्या आणि अभिषेकला तुम्ही एकत्र भांडता का? असा सवाल विचारण्यात आला होता. यावर ऐश्वर्याने ही गोष्ट कबूल केली होती. 'हो दररोज', असे उत्तर ऐश्वर्याने दिले होते. तर अभिषेकने यावर ''ती भांडणे नव्हती तर मतभेदांसारखे आहे, ते गंभीर नाहीत, ते निरोगी आहेत. अन्यथा ते खरोखर कंटाळवाणे असेल'',असे म्हटले होते. 

हे वाचलं का?

यानंतर पत्रकार अनुपमा चोप्राने एका मुलाखतीत ऐश्वर्याला विचारले की,  "अभिषेक म्हणाला की तुम्हा दोघांना 'नवीन लग्न झालेल्या जुन्या जोडप्या'सारखे वाटते, याचा अर्थ काय??" ऐश्वर्याने उत्तर दिले की,''आम्ही एकमेकांसोबत खूप आरामात होतो. मला वाटते की 'नवविवाहित' पैलू असा आहे की आम्ही जे शेअर करतो ते खूप छान आहे कारण ते अशा मैत्रीवर आधारित आहे' असे तिने म्हटले आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! सरकारने घेतला मोठा निर्णय

त्यानंतर होस्टने तिला फाईट कॉमेंटबद्दल विचारले होते. "तो असेही म्हणाला की तुम्ही दोघे रोज भांडता, हे खरे आहे का?" ऐश्वर्याने विनोदाने उत्तर दिले, ''जेव्हा मी म्हणतो की आम्ही 10 वर्षे एकत्र आहोत तेव्हा मला हेच म्हणायचे आहे. लग्नाआधीही आम्ही सुरुवातीपासूनच सामान्य होतो''.

ADVERTISEMENT

दरम्यान 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या विवाहबंधनात अडकले होते. 2011 मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. आता दोघांच्या लग्नाला 17 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यानंतर दोघेही विभक्त होणार असल्याची चर्चा सुरू आहे. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT