Anant Ambani Wedding : 'पालक चाट ते कुल्फी...', अनंत अंबानीच्या लग्नात असणार 'हा' चटपटीत मेन्यू
Anant Ambani Wedding News : अनंत अंबानींच्या लग्नातील पाहुण्यांसाठी 100 हून अधिक खासगी जेटही बुक करण्यात आली आहेत. अंबानींच्या लग्नासाठी 3 फाल्कन-2000 आणि 100 हून अधिक प्रायव्हेट जेट बुक करण्यात आले आहेत, ज्यामुळे हे लग्न खूप भव्य होईल.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अनंत अंबानींच्या लग्नात यूपीच्या बनारसची चाट दिली जाणार आहे.
ही प्रसिद्ध चाट बनारसमधील प्रसिद्ध दुकान काशी चाट भंडारची असणार आहे.
या दुकानातले मजूर हे चाट सर्व्ह करणार आहेत.
Anant Ambani Wedding Menu : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) उद्या 12 जुलैला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याची धुमधडाक्यात तयारी सुरू आहे. या लग्नाची देशापासून विदेशात चर्चा सूरु आहे. त्यात आता उद्या पार पडणाऱ्या या लग्नातील पाहुण्यांची यादी समोर आली होती. त्यानंतर आता लग्नातील चटपटीत जेवणाचा मेन्यू कार्डही समोर आला आहे. त्यामुळे लग्नात नेमका मेन्यू (Anant Ambani Wedding Menu) काय असणार आहे? हे जाणून घेऊयात. (anant ambani wedding famous kaashi chhat bhandar stall serv 5 types of chaat in radhika merchant grand wedding)
ADVERTISEMENT
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या विधींचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे लग्नात काय खास आणि काय अनोखे आहे हे जाणून घ्यायची इच्छा प्रत्येकाला असते. लग्झरीसोबतच लग्नात खाण्यावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. लग्नाच्या मेनूमध्ये अनेक पदार्थांचा समावेश केला जाईल, ज्यामध्ये यूपीच्या चाटचेही नाव आहे. अनंत अंबानींच्या लग्नात यूपीतील एका प्रसिद्ध दुकानातील चाट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana Money: 'ही' चूक केली की 1500 रुपये विसरा.. थोडं सांभाळून!
यूपीच्या बनारसची चाट देणार
अनंत अंबानींच्या लग्नात यूपीच्या बनारसची चाट दिली जाणार आहे. ही प्रसिद्ध चाट बनारसमधील प्रसिद्ध दुकान काशी चाट भंडारची असणार आहे. या दुकानातले मजूर हे चाट सर्व्ह करणार आहेत. विशेष म्हणजे हे तेच दुकान आहे जिथे काही दिवसांपूर्वी नीता अंबानी गेल्या होत्या. नीता अंबानी बनारसला गेल्यावर त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट देण्यासोबतच काशी चाट भंडारलाही भेट दिली होती. त्यामुळे या दुकान मालकाला आता नीती अंबानी यांनी लग्नाला येण्यास सांगितले.
हे वाचलं का?
काशी चाट भंडाराच्या मालकाने एएनआयशी बोलताना सांगितले की, नीता अंबानी माझ्या दुकानावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी दुकानात 4 पदार्थ खाल्ले होते. हे पदार्थ त्यांना खूपच आवडले होते. त्यामुळेच त्यांनी आम्हाला लग्नात स्टॉल लावण्यासाठी आमंत्रित केले आहे.त्यामुळे आमची टीम लग्नाला जाणार आहे.
हे ही वाचा : Manoj Jarange: 'त्या उमेदवारांना पाडायचं..', बीडमधून जरांगेंची मोठी घोषणा!
ते पुढे म्हणाले की, दुकानमालकाच्या म्हणण्यानुसार, लग्नासाठी पाच चाट बनवण्याची ऑर्डर मिळाली असून तो लग्नात पाच चाट सर्व्ह करणार आहे. त्या पाच गोष्टींमध्ये टिक्की चाट, टोमॅटो चाट, पालक चाट, चना कचोरी आणि कुल्फी यांचा समावेश आहे, ज्या काशी चाट भंडारतर्फे लग्नात दिल्या जातील. याशिवाय मेनूमध्ये अनेक पदार्थ आहेत. तसेच नीता अंबानी इथे आल्याने त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
पाहुण्यांसाठी लक्झरी सुविधा
अनंत अंबानींच्या लग्नातील पाहुण्यांसाठी 100 हून अधिक खासगी जेटही बुक करण्यात आली आहेत. अंबानींच्या लग्नासाठी 3 फाल्कन-2000 आणि 100 हून अधिक प्रायव्हेट जेट बुक करण्यात आले आहेत, ज्यामुळे हे लग्न खूप भव्य होईल.
दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलैला होणार आहे, 13 जुलैला आशीर्वाद सोहळा आणि 14 जुलैला रिसेप्शन होणार आहे. यापूर्वी 1 मार्च ते 3 मार्च या कालावधीत अनंत-राधिकाचा प्री-वेडिंग इव्हेंट गुजरातमधील जामनगरमध्ये झाला होता, ज्याची जगभरात चर्चा रंगली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT