Malaika Arora Father: मोठी अपडेट! आत्महत्येपूर्वी मलायकाला आला होता वडिलांचा शेवटचा फोन, म्हणाले...

रोहिणी ठोंबरे

Malaika Arora Father Suicide : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी 11 सप्टेंबर 2024 रोजी आत्महत्या केली.अनिल मेहता यांनी घराच्या बाल्कनीतून उडी मारून जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येचे कारण काय याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मलायका अरोराच्या वडिलांनी 11 सप्टेंबर 2024 रोजी आत्महत्या केली

point

आत्महत्येपूर्वी मलायकाच्या वडिलांनी कोणाला केला होता शेवटचा फोन?

point

मलायका अरोराच्या घरी कोण-कोण पोहोचले?

Malaika Arora Father Suicide : अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी 11 सप्टेंबर 2024 रोजी आत्महत्या केली.अनिल मेहता यांनी घराच्या बाल्कनीतून उडी मारून जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येचे कारण काय याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. या कठीण काळात बॉलिवूडमधील अनेक स्टार्स अभिनेत्रीच्या घरी पोहोचले. सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सतत समोर येत आहेत. आज मलायकाच्या वडिलांचं सकाळी 11 वाजता सांताक्रूझ येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशावेळी आत्महत्येबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. (malaika arora father funeral new update in case anil mehta last call to daughters malaika and amrita arora before suicide )

आत्महत्येपूर्वी मलायकाच्या वडिलांनी कोणाला केला होता शेवटचा फोन?

मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केली तेव्हा ती घरी नव्हती. मलायका त्यावेळी पुण्यात होती आणि ही बातमी समजल्यानंतर ती मुंबईला रवाना झाली. घटनास्थळी अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. याशिवाय तिचा एक्स पती अरबाज खान आणि एक्स बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही तिथे उपस्थित होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी अनिल यांनी आपल्या दोन्ही मुली मलायका आणि अमृता यांना फोन केला होता. अनिल यांनी मलायका आणि अमृताला फोन करून आपली व्यथा मांडली होती. "मी आता आजारी आणि थकलो आहे" असे ते म्हणाले होते. त्यानंतरच अनिल यांनी आत्महत्या केली.

मलायका अरोराच्या घरी कोण-कोण पोहोचले?

मलायका अरोराच्या वडिलांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी घरी पोहोचले आहेत. एक्स पती अरबाज खान पहिला व्यक्ती होता जो अभिनेत्रीच्या घरी पहिल्यांदा पोहोचलेला दिसला होता. याशिवाय सोहेल खान आणि त्याची एक्स पत्नी सीमा सजदेह, सलीम खान, हेलन, सुशीला, अर्पिता खान, अलविरा अग्निहोत्री हे देखील त्यांच्या घरी दिसले. याशिवाय काजोल, रितेश देशमुख, किम शर्मा, अरहान खान, नेहा धुपिया, अंगद बेदी, सोफी चौधरी निवासस्थानी दिसले. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp