हुक्का पार्लरमध्ये पोलिसांची रेड, BB17 विजेता Munawar Faruqui ला पकडलं रंगेहाथ!  

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

BB17 Winner Munawar Faruqui : बिग बॉस 17 चा (bb17) विजेता मुनावर फारुकीबद्दल (Munawar Faruqui) एक मोठी बातमी समोर येत आहे. मंगळवारी (26 मार्च) रात्री उशिरा मुंबई पोलिसांच्या एसएस शाखेने (सोशल सर्व्हिस ब्रॅंच) हुक्का बार पार्लरवर छापा टाकला. जिथे त्यांनी स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकीसह 14 जणांना ताब्यात घेतले. सर्व आरोपींविरुद्ध COTPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी मुनावर फारुकीला कलम 41A अन्वये नोटीस देऊन सोडून दिलं आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

मुनवर फारुकी सापडला अडचणीत 

बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादवनंतर आता बिग बॉस 17 चा विजेता मुनावर फारुकी वादात सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री मुंबईतील फोर्ट परिसरात असलेल्या सबलन हुक्का पार्लरवर सोशल सर्व्हिस ब्रँचने छापा टाकून काही लोकांना ताब्यात घेतले. मुनावर हा देखील या लोकांपैकी एक होता.

हुक्का पार्लरमध्ये तंबाखूजन्य पदार्थांसह निकोटीनचा वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तंबाखूजन्य पदार्थ आढळल्यास पोलिसांकडून सिगारेट आणि तंबाखू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. मात्र, मुनावर फारुकीला नोटीस देऊन रात्रीच घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. या प्रकरणी मुनावरने कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

हे वाचलं का?

याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी काय म्हणाले?

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, फोर्टमध्ये चालणाऱ्या हुक्का पार्लरवर छापा टाकला तेव्हा मुनावर फारुकी घटनास्थळी उपस्थित होता. चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह दिसला. कारण हा दखलपात्र गुन्हा आहे. यासाठी त्याला शिक्षा होऊन सोडून देण्यात आले आहे. फारुकी यांच्यावर सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा, 2003 आणि COTPA 2003 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर इतरही अनेक कलमे लावण्यात आली आहेत.

हुक्का पार्लरमधून पोलिसांनी 4400 रुपये रोख आणि 9 हुक्क्याची भांडी जप्त केली आहेत. या भांड्यांची किंमत सुमारे 13 हजार 500 रुपये आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

मुनावर यापूर्वीही सापडला होता वादात

मुनावरचे नाव वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2021 मध्ये, इंदूरमध्ये स्टँड-अप कॉमेडी कार्यक्रमादरम्यान भगवान रामाबद्दल काही असंवेदनशील टिप्पणी केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्याने सुमारे 35 दिवस तुरुंगात काढले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याला केवळ ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागला नाही तर त्याचे अनेक शो रद्दही झाले.

ADVERTISEMENT

यानंतर त्याने कंगना राणौतच्या शो लॉकअपमधून एक नवीन प्रवास सुरू केला. शोचा विजेता बनून तो प्रसिद्धीच्या झोतात आला. लॉकअप जिंकल्यानंतर, त्याने बिग बॉस 17 मध्ये भाग घेतला आणि शोचा विजेता म्हणून बाहेर पडला. बिग बॉस जिंकल्यानंतर त्याचा आनंद शिगेला पोहोचला होता. पण आता पुन्हा एकदा त्याचं नाव वादात सापडलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT