कधी चांद्रयानाची खिल्ली, तर कधी..., Prakash Raj आता कोणत्या कारणामुळे आले गोत्यात?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रकाश राज यांच्या कोणत्या वक्तव्याने सुरू झाला नवा वाद?

point

प्रकाश राज यांनी कोणते वादग्रस्त वक्तव्य केले आहेत?

Prakash Raj Controversial statement : बॉलिवूड (Bollywood) ते साऊथ इंडस्ट्रीत गाजलेला खलनायक म्हणजे अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj). त्यांनी त्यांच्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची वादग्रस्त विधानं तुफान व्हायरल होत आहेत. ज्यावेळी संपूर्ण देश चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लॅंडिंगचा आनंद साजरा करत होता त्यावेळी प्रकाश राज यांचं एक ट्वीट व्हायरल होत होतं. (Prakash Raj Controversial statement he compares palestine with kashmir)

ADVERTISEMENT

प्रकाश राज यांनी चांद्रयानची खिल्ली उडवली होती. त्यांनी ट्विटरवर एका चहावाल्याचं कार्टून शेअर केलं होतं. यावर कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, 'चंद्रावरून आलेला पहिला फोटो', यानंतर लोकांनी त्यांच्यावर अॅंटी सक्सेस आणि अँटी सायन्स असल्याचे आरोप केले होते. या सर्व प्रकरणानंतर नुकतंच त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. 

प्रकाश राज यांच्या कोणत्या वक्तव्याने सुरू झाला नवा वाद?

प्रकाश राज यांनी पॅलेस्टाईनची तुलना काश्मीरशी केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या वक्तव्यात असं काही म्हटलं आहे ज्यामुळे, यूजर्सही संतापले आहेत.

हे वाचलं का?

त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये ते म्हणतायेत की, 'पॅलेस्टाईनमध्ये जे काही चाललं आहे ते न्याय आहे का? आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे ते न्याय आहे? बाजू घेण्यात कोणता मुद्दा नाही. तुम्ही फक्त त्यांना त्यांची जमीन द्या.'

प्रकाश राज पुढे म्हणाले, 'ते कसे जिवंत राहतात हे आपलं काम नाही. आपल्याला मोठा भाऊ व्हायला हवं. काश्मीरच्या बाबतीत मोठा भाऊ व्हायला हवं होतं, पण तसं झालं नाही.' हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि प्रकाश राज यांना ट्रोल केलं जात आहे. त्यांनी याआधी सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यामुळे अनेकवेळा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT