Shraddha Kapoor : बॉलिवूडमध्ये आणखी एक हार्टब्रेक! श्रद्धा कपूरचं राहुल मोदीसोबत ब्रेकअप?
Shraddha Kapoor News : काही नेटकऱ्यांनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. सध्या श्रद्धा कपूर सध्या स्त्री 2 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात श्रद्धासोबत राजकुमार राव, पंकज त्रिपाठी झळकणार आहेत. हा सिनेमा येत्या 15 तारखेला रिलीज होणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
श्रद्धा कपूरचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर
बॉयफ्रेंडला केलं सोशल मीडियावर अनफॉलो
पब्लिसिटी स्टंट असल्याचीही चर्चा सूरू
Shraddha Kapoor Break up : बॉलिवूडमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना आणखीण एक हार्टब्रेक झाल्याची घटना घडली आहे. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हीच राहुल मोदीसोबत (Rahul Modi) ब्रेक अप झाल्याची सुत्रांकडून माहिती मिळते आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून बॉयफ्रेंडला अनफॉलो केल्यानंतर आता त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. ( shradhha kapoor broke up with rahul modi unfollowed him all social media platform stree 2 movie actress bollywood shocking news)
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी स्त्री 2 सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान श्रद्धा कपूरचं ब्रेकअप झाल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली आहे. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने नुकतंच तिच्या नात्याला ऑफिशिअल केले होते. त्यानंतर चाहते तिच्या लग्नाची वाट पाहात होते. पण आता तिचे ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : Raj Thackeray: हॉटेलमध्ये राडा, मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंना घेरलं... काय घडलं?
श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरून अनफॉलो केले आहे. इतकंच नाही तर श्रद्धा कपूरने राहुल मोदीच्या बहिणीचे प्रोडक्शन हाऊस आणि बॉयफ्रेंडच्या श्वानाचे अकाऊंट देखील अनफॉलो केले आहे. त्यामुळे या घटनेनंतर ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. या ब्रेकनंतर दोघांनी आपले वेगवेगळे मार्ग निवडले आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वीच श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबतची एक फोटो शेअर केली होती. या पोस्टच्या कॅप्शनला ''दिल रखे ले नींद तो वापस कर दे यार'' अशी रोमँटीक कमेंट केली होती. ही पोस्ट श्रद्धाने राहुल मोदीला देखील टॅग केली होती. मात्र या पोस्टनंतर आता दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याची चर्चा सूरू आहे.
दरम्यान काही नेटकऱ्यांनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. सध्या श्रद्धा कपूर सध्या स्त्री 2 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात श्रद्धासोबत राजकुमार राव, पंकज त्रिपाठी झळकणार आहेत. हा सिनेमा येत्या 15 तारखेला रिलीज होणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Prakash Ambedkar : 'मनोज जरांगे हा शरद पवारांचा माणूस', आंबेडकरांची बोचरी टीका
ADVERTISEMENT