Raj Thackeray: हॉटेलमध्ये राडा, मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंना घेरलं... काय घडलं?
Raj Thackeray News : राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज ते सोलापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी धाराशीवमध्ये एका हॉटेलमध्ये राज ठाकरे विश्रांतीसाठी थांबले असल्याची माहिती आहे. या दरम्यानच चार ते पाच मराठा आंदोलक हॉटेलमध्ये शिरले होते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत.
धाराशीवच्या हॉटेलमध्ये राज ठाकरेंना मराठ्यांनी घेरलं
मराठा आंदोलकांची हॉटेलमध्ये घोषणाबाजी आणि ठिय्या
Raj Thackeray vs Maratha Protest : गणेश जाधव, धाराशीव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसल्याची घटना धाराशीवमध्ये घडली आहे. राज ठाकरे यांनी आम्हाला भेटीची वेळ द्यावी आणि मराठा आरक्षणावर (Maratha reservation) आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आदोलकांनी केली होती. मात्र राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भेट नाकारल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. त्यामुळे मराठा आंदोलकांनी आक्रमक पावित्रा घेत जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या मांडला होता. (raj thackeray stay dharashiv hotel maratha protesters slogans and protest maratha reservation manoj jarange)
ADVERTISEMENT
राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज ते सोलापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी धाराशीवमध्ये एका हॉटेलमध्ये राज ठाकरे विश्रांतीसाठी थांबले असल्याची माहिती आहे. या दरम्यानच चार ते पाच मराठा आंदोलक हॉटेलमध्ये शिरले होते. या आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या बॉडीगार्डजवळ भेटीची मागणी केली होती. मात्र राज ठाकरेंकडून भेट नाकारल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली होती. या कारणामुळे मराठा आंदोलक संतप्त झाले होते.
हे ही वाचा : Bangladesh Violence: आरक्षणाच्या वादामुळे पंतप्रधानपद गेलं, बांग्लादेशात तुफान हिंसाचार.. शेख हसीना भारतात!
राज ठाकरे यांनी आम्हाला भेटीची वेळ द्यावी आणि मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आदोलकांनी केली होती. मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. त्यामुळे मराठा आंदोलकांनी आक्रमक पावित्रा घेत जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली होती. मराठा आंदोलक इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हॉटेलमध्ये ठिय्याही मांडला होता.
हे वाचलं का?
हा संपूर्ण प्रकार हॉटेलमध्ये घडत असताना राज ठाकरे हॉटेलमधून खाली आले आणि त्यांनी सर्वप्रथम आंदोलकांना घोषणा थांबण्यास सांगितले. त्यानंतर राज ठाकरे यांनी 'तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे ना, मग वरती या'',असे म्हटले आहे. यानंतर देखील मराठा आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत.
दरम्यान राज ठाकरे थांबलेल्या पुष्पक पार्क हॉटेल समोर राज ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा व आंदोलन सुरु केल्यानंतर आता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस अधीक्षक आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Prakash Ambedkar : 'मनोज जरांगे हा शरद पवारांचा माणूस', आंबेडकरांची बोचरी टीका
राज ठाकरेंच्या चर्चेच्या निमंत्रणानंतर देखील मराठा आंदोलक हॉटेलबाहेर ठिय्या देत आहेत. मराठा आंदोलकांनी पाच जणांना राज ठाकरेंसोबत बोलण्याची संधी मिळावी असे म्हटले आहे. तसेच आमच्यासोबत मीडिया देखील असावा. मीडियाच्या समोर ही चर्चा व्हावी असे म्हटले आहे. तसेच आमच्या जीवाला धोका आहे, बंद दाराआड चर्चा नको,असे आंदोलकांनी म्हटले आहे. आता मराठा आंदोलक आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT