Tillotama Shome : ''ड्रायव्हरने पँटची चैन उघडली अन्...'', बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला भंयकर अनुभव
Tillotama Shome News : ''लस्ट स्टोरीज 2'' मधून प्रचंड चर्चेत आलेल्या बॉलिवूड अभिनेत्री तिलोत्तमा शोमला राजधानी दिल्लीत भयंकर अनुभव आला होता. हा भयंकर प्रसंग तिने एका मुलाखतीत सांगितला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बॉलिवूड अभिनेत्री तिलोत्तमा शोमने भयंकर अनुभव शेअर केला आहे
राजधानी दिल्लीत तिला हा भयंकर अनुभव आला होता
हा भयंकर प्रसंग तिने एका मुलाखतीत सांगितला आहे.
Tillotama Shome News : बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री वाईट अनुभवाच्या शिकार ठरल्या आहेत. प्रत्येक अभिनेत्रीचे धक्कादायक आणि भयंकर असे अनुभव आले आहे. आता असाच अनुभव ''लस्ट स्टोरीज 2'' मधून प्रचंड चर्चेत आलेल्या बॉलिवूड अभिनेत्री तिलोत्तमा शोमने (Tillotama Shome) शेअर केला आहे. राजधानी दिल्लीत तिला हा भयंकर अनुभव आला होता. हा भयंकर प्रसंग तिने एका मुलाखतीत सांगितला आहे. (tillotama shome share a terrifying incident in delhi man unzipped his pants and force to hand shocking news bollywood story)
ADVERTISEMENT
अभिनेत्री तिलोत्तमा शोमने हॉटरफ्लायला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिलोत्तमा शोम सांगते की, ''मी दिल्लीत अपरात्री बसची वाट पाहत होते. या दरम्यान अचानक एक कार माझ्याजवळ येऊन थांबली होती. या कारमध्ये सहा जण होते. त्यांना पाहून मला फारच अस्वस्थ वाटलं. त्यामुळे तेथून मी दूर निघून गेले. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे पाहून विचित्र हावभाव करायला सुरूवात केली. त्यांच्यातल्या एकाने माझ्यावर छोटा दगडही भिरकावला होता''.
हे ही वाचा : Sharad Pawar : अमित शाहांवर पवारांचा दुसरा हल्ला, म्हणाले, "तो दिवा जेलमध्ये..."
''मला यावेळी लक्षात आलं होतं की इथून निघायला हवं. मी तिथून पळण्याचा विचार केला. पण ते कारमध्येच होते आणि मला सहद पकडू शकले असते. त्यानंतर मी रस्त्याच्या मधोमध उभं राहुन मदत मागायला सुरुवात केली.खूप गाड्या रस्त्यावरू गेल्या पण कुणीही मदत केली नाही.''
हे वाचलं का?
काही वेळानंतर मला एका मेडिकल साईन असलेली एक कार दिसली. मला वाटलं की डॉक्टरची गाडी असल्याने मी सुरक्षित राहीन. मी त्या गाडीत पूढच्या सीटवर बसले. पण काही वेळाने गाडीच्या ड्रायव्हरने त्याच्या पँटची चैन उघडली आणि माझा हात पकडला. आणि माझा हात त्याच्याजवळ ओढण्याचा प्रयत्न केला. पण मी माझा हात झटक्यात मागे घेतला. यानंतर ड्रायव्हर देखील गोंधळला. या घटनेनंतर ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि मला खाली उतरण्यास सांगितले'', असा भयानक अनुभव तिलोत्तमाने सांगितला.
माझ्या आयुष्यातला हा भयानक अनुभव होता. मी या घटनेने हादरले होते. पण विरोध केल्यामुळे मी एका भयंकर परिस्थितीतून बाहेर पडू शकले होते. या घटनेनंतर मी घरी न जाता मैत्रिणीकडे गेले होते, असं तिलोत्तमा शोमने सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Crime : गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला, गळा अन् पोटावर सपासप वार...; थरकाप उडवणारा व्हिडिओ
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT