New Jersey show: Akshay Kumar चा ‘द एंटरटेनर्स’ शो का रद्द झाला?; समोर आलं हे कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Akshay kumars show cancelled: अभिनेता अक्षय कुमारचे सध्या कदाचित वाईट दिवस सुरु आहेत. नुकतंच आलेल्या (Selfie) ‘सेल्फी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box office ) चांगली कमाई केली नाही. आत. परदेशातील त्याचा शो देखील रद्द करण्यात आला आहे. अक्षय कुमारचा न्यू जर्सीचा (akshay kumar) शो रद्द झाल्याची बातमी समोर येत आहे. अभिनेत्याच्या शोची तिकिटे तेथे विकली गेली नाहीत, त्यानंतर हा दौरा रद्द करावा लागला, असे सांगण्यात येत आहे. Why was Akshay Kumar’s ‘The Entertainers’ show cancelled?

ADVERTISEMENT

Akshay kumar : अक्षय सोडणार कॅनडाचं नागरिकत्व? म्हणाला, ‘मला वाईट वाटतंय…’

न्यू जर्सीचे प्रमोटर ‘द एंटरटेनर्स’ने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. धर्म कॉर्नरस्टोन एजन्सीने या कार्यक्रमाची पूर्णपणे संकल्पना केली होती, परंतु स्थानिक आणि राष्ट्रीय आयोजकांमध्ये काही संघर्ष झाला, त्यानंतर अभिनेता आणि त्याच्या टीमचा न्यू जर्सीतील कार्यक्रम रद्द करावा लागला.

हे वाचलं का?

परदेश दौरा रद्द

SAI USA INC ने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, “कधीकधी आम्हाला कठीण गोष्टी निवडाव्या लागतात. आम्ही तुम्हा सर्वांची माफी मागतो, कारण अक्षय कुमारचा ‘द एंटरटेनर्स टूर’ रद्द केला जात आहे. ज्यांनी तिकिटे खरेदी केली, त्यांचे पैसे परत केले जातील. दिशा पटानी, नोरा फतेही, सोनम बाजवा, मौनी रॉय, जसलीन रॉयल आणि अपारशक्ती खुराना देखील अक्षय कुमारसोबत या फॉरेन टूरवर गेले आहेत.

ADVERTISEMENT

Akshay Kumar तो प्रश्न विचारताच रडू लागला; म्हणाला, ‘आजही विश्वास बसत नाही’

ADVERTISEMENT

उदयसिंह गौरी यांना याबाबत विचारले असता त्यांनी असे काही नसल्याचे सांगितले. ‘द एंटरटेनर्स टूर’ ट्रॅकवर आहे. सध्या सुरू असलेल्या सर्व बातम्या अफवा आहेत. टीम निघाली आहे. होय, हे निश्चित आहे की न्यू जर्सीमधील शो रद्द करण्यात आला आहे, कारण स्थानिक आणि राष्ट्रीय आयोजक यांच्यात काही भांडण झाले होते, म्हणून. बाकीचे शो ट्रॅकवर आहेत. सर्व शो वेळापत्रकानुसार होतील, असं ते म्हणाले.

अक्षय कुमारच्या करिअरच्या आलेखाबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा ‘सेल्फी’ चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. वीकेंडलाही कलेक्शन कमालीचे घसरले आहे. मात्र, अक्षय जेव्हा या चित्रपटाचे प्रमोशन करत होता, तेव्हा त्याने सांगितले की, या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना एक कॉमेडी प्रकार पाहायला मिळणार आहे जो त्यांनी याआधी कधीही पाहिला नसेल. अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात इमरान हाश्मी आणि नुसरत भरुचा देखील मुख्य भूमिकेत दिसले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT