सुशांत सिंह राजपूतची हत्या की आत्महत्या?, 2 वर्षानंतर सीबीआयचा तपास कुठंपर्यंत पोहोचलाय?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

SSR death anniversary : १४ जून २०२०! साधारत: दुपारची वेळ होती. अचानक बातमी धडकली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह सापडला. त्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. हत्या की आत्महत्या, अशा शंका उपस्थित केल्या गेल्या अन् तपास सीबीआयकडे गेला. आज दोन वर्ष उलटूनही सुशांत सिंह राजपूतची हत्या केली गेली की आत्महत्या होती हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आज (१४ जून) दुसरी पुण्यतिथी आहे. २०२० मध्ये आजच्याच दिवशी सुशांतचा मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या अपार्टमेंटमध्ये मृतदेह आढळून आला होता. गळफास लागलेल्या अवस्थेत सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह सापडला होता.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवरून बरंच राजकारण झालं. सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केली गेली. तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे गेला. पुढे या प्रकरणात एनसीबी (अंमली पदार्थ नियंत्रण विभाग), ईडी आली. मात्र, अद्याप सुशांतच्या मृत्यूचं गुढ कायम आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

१४ जून २०२० पासून आतापर्यंत काय घडलं?

– १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह वांद्रेतील घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दुसऱ्या दिवशी त्याच्या मृतदेहावर विलेपार्लेतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

ADVERTISEMENT

– १८ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड असलेल्या रिया चक्रवर्तीने वांद्रे पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला. आमच्यात वाद झाला होता आणि ८ जून रोजी मी सुशांत सिंह राजपूतच्या घरातून निघून गेले होते, असं तिने पोलिसांना सांगितलं.

ADVERTISEMENT

– ४ जुलै २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या भूमिकेप्रमाणे या प्रकरणात चौकशीची मागणी केली होती.

– १४ जुलै २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने इन्स्टाग्रामवर सुशांतसोबतचा फोटो शेअर केला आणि सुशांत बॉयफ्रेंड होता याची कबुली दिली. त्याचबरोबर सीबीआय चौकशीची मागणी केली.

– २८ जुलै २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी पटनामध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांनी रिया चक्रवर्तीवर सुशांतची फसवणूक केल्याचा, पैशांची हेराफेरी केल्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला.

– २९ जुलै २०२० रोजी रिया चक्रवर्तीने तिच्या विरुद्ध पटना येथे दाखल करण्यात आलेला गुन्हा मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली. तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

– ३० जुलै २०२० रोजी ईडीने सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांच्या तक्रारीवरून रिया चक्रवर्ती आणि अन्य लोकांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला.

– ५ ऑगस्ट २०२० रोजी केंद्र सरकारने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस केली.

– १९ ऑगस्ट २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. त्याचबरोबर मुंबई पोलिसांना या प्रकरणाशी संबंधित सर्व रिपोर्ट सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेशही दिले. सीबीआय तेव्हापासून या प्रकरणाचा तपास करत आहे.

– ४ सप्टेंबर २०२० रोजी ईडीच्या विनंतीच्या आधारावर एनसीबीने रिया चक्रवर्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि या मृत्यू प्रकरणाचा ड्रग्जच्या अंगाने तपास सुरू केला. ४ सप्टेंबर रोजी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ आणि सुशांत सिंहचा मॅनेजर सॅम्युअलला अटक केली.

– ७ सप्टेंबर २०२० रोजी रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह राजपूतची बहीण प्रियंका सिंहविरुद्ध तक्रार दिली. खोटी प्रिस्क्रिप्शन बनवून सुशांतला औषधी दिल्याचा आरोप रियाने प्रियंका सिंहवर केला.

– ८ सप्टेंबर २०२० रोजी सुशांत सिंह प्रकरण ड्रग्जचा अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने तपास सुरू केला होता. तपासाच्या ८७ दिवसांनंतर म्हणजे ८ सप्टेंबर रोजी रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आलं.

– २३ सप्टेंबर २०२० रोजी दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर यांची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली.

– ५ ऑक्टोबर २०२० रोजी एम्सच्या बोर्डाने सुशांत सिंहच्या मृत्यूबद्दल एक अहवाल सीबीआयला दिला. या रिपोर्टमध्ये सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याचं म्हटलं होतं.

– ७ ऑक्टोबर २०२० रोजी २८ दिवसांपासून तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्तीला जामीन मिळाला.

– मार्च २०२१ मध्ये एनसीबीने या प्रकरणात विशेष न्यायालयात १२००० पानांचं आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकसह एकूण ३३ जणांना आरोपी बनवण्यात आलेलं होतं. दुसरीकडे सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेलं नाही. या प्रकरणाचा तपास सीबीआयबरोबरच ईडी आणि एनसीबी करत आहे.

सुशांतच्या मृत्यूचा तपास कुठंपर्यंत पोहोचला, सीबीआयने काय म्हटलंय?

काही महिन्यापूर्वी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी आरटीआयच्या माध्यमातून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठंपर्यंत आलाय, अशी माहिती त्यांनी सीबीआयला विचारली होती.

या प्रश्नाला उत्तर देताना सीबीआयने म्हटलं होतं की, ‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास अजून सुरूच आहे. तपासाच्या प्रगती अहवालाबद्दल माहिती दिली, तर त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाबद्दल सध्या कुठलीही माहिती दिली जाऊ शकत नाही. प्रकरणाचा तपास प्रगतीपथावर आहे’, असं सांगत सीबीआयने माहिती देण्यास नकार दिला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT