सुशांत सिंग प्रकरण: ‘रियाचे बँक अकाउंट डीफ्रीज करा, मोबाइल-लॅपटॉपही परत द्या’, कोर्टाच्या आदेशाने NCBला धक्का
मुंबई: अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला अनेक दिवस तुरुंगात काढावे लागले होते. बराच काळ ती न्यायालयाच्या कायदेशीर प्रक्रियेत अडकली होती. यावेळी कारवाईसाठी रियाचा पासपोर्ट, फोन, लॅपटॉप आदी साहित्य जप्त करण्यात आले होते. एवढंच नव्हे तर तिची बँक खातेही गोठवण्यात आली होती. सुशांतच्या मृत्यूची जेव्हा सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती तेव्हा […]
ADVERTISEMENT

मुंबई: अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला अनेक दिवस तुरुंगात काढावे लागले होते. बराच काळ ती न्यायालयाच्या कायदेशीर प्रक्रियेत अडकली होती. यावेळी कारवाईसाठी रियाचा पासपोर्ट, फोन, लॅपटॉप आदी साहित्य जप्त करण्यात आले होते. एवढंच नव्हे तर तिची बँक खातेही गोठवण्यात आली होती.
सुशांतच्या मृत्यूची जेव्हा सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती तेव्हा त्याचवेळी ड्रग्स अँगल देखील समोर आला होता. ज्यामध्ये रियाचाही सहभाग असण्याचा आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) केला होता. एनसीबीच्या याच आरोपानंतर कोर्टाने रियाचे बँक खाते गोठविण्याचे आदेश दिले होते. पण आता या सगळ्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा मिळाला आहे तर एनसीबीला मात्र मोठा धक्का बसला आहे.
रियाने दाखल केली होती याचिका
दरम्यान, सगळे गॅझेट्स तिला परत मिळावे, बँक खाती पूर्ववत करावीत यासाठी रियाने त्याबाबत कोर्टाकडे एक याचिका दाखल केली होती. रियाने केलेल्या या मागणीबाबत आता विशेष न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल एका वर्षानंतर रियाला तिचे बँक खात्यांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एवढेच नाही तर रियाला तिचे गॅझेटही परत देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. त्यामुळे कोर्टाचा हा निर्णय रियासाठी मोठा दिलासा आहे. दुसरीकडे कोर्टाच्या या निर्णयामुळे एनसीबीला मात्र मोठा सेटबॅक बसला आहे.










