न्यूड सीन करण्यापूर्वी रडलेली ‘ही’ अभिनेत्री रडली, आज जगतेय असे आयुष्य…

मुंबई तक

सोनमला लोक सोनम खान (Sonam Khan) या नावाने जरी ओळकत असले तरी तिचे खरे नाव मात्र ‘बख्तावर खान’ आहे. तिने वयाच्या 13 व्या वर्षी तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तर, वयाच्या 19 व्या वर्षी तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर लगेचच ती परदेशात गेली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Bollywood : Sonam Khan : बॉलिवूडमध्ये (Bollywood) 90’s च्या दशकातील एक अभिनेत्री अशी जिची त्या काळात प्रचंड क्रेझ होती. पण एक काळ असा आला जेव्हा ती अचानक सिनेसृष्टीतून गायब झाली. या अभिनेत्रीचं नाव सोनम खान आहे. सोनमला लोक सोनम खान (Sonam Khan) या नावाने जरी ओळकत असले तरी तिचे खरे नाव मात्र ‘बख्तावर खान’ आहे. तिने वयाच्या 13 व्या वर्षी तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तर, वयाच्या 19 व्या वर्षी तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर लगेचच ती परदेशात गेली.

अभिनेत्री सोनमने 1998 मध्ये यश चोप्रा यांच्या ‘विजय’ चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘त्रिदेव’, ‘मिट्टी आणि सोना’ अशा सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये तिने काम केले. या चित्रपटांनी तिला रातोरात स्टार बनवले आणि अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. चित्रपटांमध्ये तिने बोल्डनेसची मर्यादा ओलांडली होती. पहिल्याच चित्रपटात सोनमने किसिंग सीन देऊन प्रेक्षकांना चकित केले होते. ९० च्या दशकात अशी दृश्ये देणारी ती एकमेव अभिनेत्री असल्याचे बोलले जाते. त्यावेळी सोनम फक्त 16-17 वर्षांची होती. पण 19 व्या वर्षी लग्न केल्यानंतर तिचे आयुष्य फार बदलले.

आप्पासाहेब धर्माधिकारींच्या श्री समर्थ बैठकीतील अधिष्ठान म्हणजे काय.. श्री सदस्यांना कसं मिळतं?

सोनमच्या करिअरची सुरुवात कशी झाली?

सुंदर डोळे, दाट केस, चेहऱ्यावर हसू आणि गोंडस चेहरा असलेली सोनम बिंदास गर्ल म्हणून ओळखली जात असे. तिने वयाच्या साडे तेराव्या वर्षी काम करायला सुरुवात केली होती. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. यामुळे बळजबरीने सोनमला काम करावे लागले. सोनमने एके दिवशी दुपारी तिची मावशी झीनत अमानला कामासाठी विनंती केली. कोणतेही छोटे काम करेन, मेहनत करेन पैसे कमवेल आणि घर चालवेल. असे ती म्हणाली होती. झीनतने त्याला काही मॉडेलिंग प्रोजेक्ट्स मिळवून दिले. सोनमने पैसे कमवायला सुरुवात केली होती. यानंतर तिने ऑडिशन दिले आणि पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

यश चोप्रांनी बदलले होते नाव

1988 मध्ये सोनमने ‘आखरी अदालत’ हा चित्रपट केला. त्यानंतर तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला. पण तिथे ती फार काळ राहिली नाही. यानंतर सोनमला यश चोप्रा यांनी ‘बख्तावर खान’ मधून सोनम बनवले होते. हे नाव यश चोप्रा यांनी तिला दिले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp