Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अब्जाधीश सेलिब्रिटींचा देसी डान्स, अशी वरात तुम्ही पाहिली नसेल!
Anant Ambani-Radhika Merchant: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी हे डान्स करताना पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
Anant Ambani-Radhika Merchant: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी हे डान्स करताना पाहायला मिळत आहे.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding Video: मुंबई: अनंत अंबानी याचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सेलिब्रिटींची गर्दी आहे. अनंतच्या लग्नाची वरात ही कार्यक्रमस्थळी पोहोचली आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये प्रियांका चोप्रापासून ते रणवीर सिंगपर्यंत सर्वजण नाचताना आणि गाताना दिसत आहेत. (anant ambani radhika merchant wedding celebration billionaire celebs did desi dance you must not have seen such a procession)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अनंत आणि राधिकाच्या लग्न सोहळ्यात अनेक सेलिब्रिटी हे एन्जॉय करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर 71 वर्षीय रजनीकांत हे रणवीर सिंगसोबत डान्स करतानाही दिसले.
अर्जुन कपूर, अनिल कपूर, जान्हवी कपूर, शिखर, अनन्या पांडे आणि ओरीचे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणवीर, अनिल आणि वरुण धवनही लग्नाच्या वरातीत गोविंदाच्या गाण्यांवर डान्स करताना दिसले. तर ईशा अंबानी देखील आपल्या भावाच्या लग्नात सेलिब्रेट करताना दिसली.
हे वाचलं का?
याशिवाय निक जोनास, प्रियांका चोप्रा यांनी आकाश अंबानी यांची भेट घेतली. त्यानंतर प्रियांकाने 'चिकनी चमेली'वर जबरदस्त डान्सही केला. तर रेसलर जॉन सीनाही नाचताना दिसला. तेथे उपस्थित असलेले चाहते त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले. संजय दत्तनेही नीता आणि मुकेश अंबानींसोबत डान्स करताना दिसून आला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT