Gadar 2 : पठाण, बाहुबलीला पछाडलं! गदर 2 ची रेकॉर्ड ब्रेक कमाई,किती कोटी कमावले? - Mumbai Tak - gadar 2 day 5 box office collection break prabhas bahubali 2 record sunny deol movie - MumbaiTAK
बातम्या मनोरंजन

Gadar 2 : पठाण, बाहुबलीला पछाडलं! गदर 2 ची रेकॉर्ड ब्रेक कमाई,किती कोटी कमावले?

:बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या गदर 2 सिनेमाने बॉक्स ऑफिससवर गदर केला आहे. या सिनेमाने रिलीजपासून बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. सलग पाचव्या दिवशी केलेल्या कमाईनंतर गदर 2 सिनेमाने आता 200 कोटीचा पल्ला गाठला आहे.
gadar 2 day 5 box office collection break prabhas bahubari 2 record sunny deol movie

Gadar 2 Box office Collection:बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol)  गदर 2 (Gadar 2)सिनेमाने बॉक्स ऑफिससवर गदर केला आहे. या सिनेमाने रिलीजपासून बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. सलग पाचव्या दिवशी केलेल्या कमाईनंतर गदर 2 सिनेमाने आता 200 कोटीचा पल्ला गाठला आहे. या कमाईमुळे सनी देओलच्या या सिनेमाने पठाण, बाहुबली सारख्य़ा सुपरहिट सिनेमांना कमाईत मागे टाकले आहे. दरम्यान गदर 2 सिनेमाची प्रेक्षकांमधली क्रेझ पाहता, हा सिनेमा कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ( gadar 2 day 5 box office collection break prabhas bahubali 2 record)

पाच दिवसात किती कमावले?

मंगळवारी 15 ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्यदिन साजरा केला. या दिवशी अनेकांनी सुट्टी असल्याने गदर 2 सिनेमाला मोठा प्रेक्षकवर्ग लाभला. ज्यामुळे सिनेमाने पाचव्या दिवशी सर्वाधिक कमाई केली. या कमाईमुळे आता या सिनेमाने 200 कोटीचा पल्ला गाठला आहे. यासह अनेक सिनेमांना पछाडलं देखील आहे.

हे ही वाचा : Akshay Kumar :अक्षय कुमार भारतीय झाला,आता निवडणूक लढवणार?

गेल्या शुक्रवारी म्हणजेच 11 जुलैला गदर 2 सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमाने 40.10 कोटी रूपयांची कमाई करून खाते उघडले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमाने 43.08 करोड रूपयाची कमाई केली होती. यानंतर रविवारी तिसऱ्या दिवशी गदर 2 सिनेमाने 51.7 करोडचा गल्ला जमवला होता. तर चौथ्या दिवशी सोमवारी सिनेमाने 38.7 करोडची कमाई केली होती. मंगळवारी पाचव्या दिवशी गदर 2 सिनेमाने 55.40 करोड रूपयांची सर्वांधिक कमाई केली. सिनेमा एका दिवसात इतकी कमाई करेल की नाही, याची मेकर्सना कल्पना देखील नव्हती.

200 कोटी क्लबमध्ये दाखल

चित्रपट समीक्षक तरूण आदर्शने दिलेल्या माहितीनूसार, गदर 2 सिनेमाने पाचव्या दिवशी 55.40 करोड रूपयांचा गल्ला जमवला. यामुळे गदर 2 सिनेमात पाच दिवसात 228.98कोटीच्या कमाई करून 200 करोडच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. त्याचसोबत हा आकडा गाठून गदर 2 सिनेमान शाहरूख खानचा पठाण सिनेमा आणि प्रभासच्या बाहुबली सिनेमाला कमाईत मागे टाकले होते. पठाणने 4 दिवसात 212.5 कोटी कमावले होते. बाहुबली 2 ने 6 दिवसात 224 करोडचा गल्ला जमवला होता. त्यामुळे या दोन्ही सिनेमाला कमाईत गदर 2 ने पछाडलं आहे. दरम्यान द केरल स्टोरी सिनेमाने 242 कोटीचा गल्ला जमवला होता. हा आकडा आता गदर 2 सिनेमा सहज गाठेल असे बोलले जात आहे.

गदर 2 सिनेमाची प्रेक्षकांमधली क्रेझ पाहता, हा सिनेमा कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : Bigg Boss OTT 2 winner : घरच आहे 14 कोटींचं, एल्विश यादवची महिन्याची कमाई किती?

जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट! Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष!