Mumbai Tak /बातम्या / ‘अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर आयुष्य किती बदललं?’ मलायका स्पष्टच बोलली
बातम्या बॉलिवूड मनोरंजन

‘अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर आयुष्य किती बदललं?’ मलायका स्पष्टच बोलली

India Today Conclave 2023 : इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2023 चा शेवटचा दिवस नेत्रदीपक होता. बॉलिवूड दिवा मलायका अरोरा (Malaika Arora) शनिवारी झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. मलायकाने या कार्यक्रमात तिच्या आयुष्याबद्दल आणि करिअरबद्दल मोकळेपणाने सांगितले. अरबाज खानपासून (Arbaz Khan) घटस्फोट घेतल्यानंतर तिच्या आयुष्यात काय बदल घडले हे अभिनेत्रीने सांगितले. याशिवाय ती अर्जुन कपूरसोबत कधी लग्न करणार आहे, हे देखील सांगितले. (How much has life changed after the divorce with Arbaaz? Malaika spoke clearly)

मलायकाचे आयुष्यच बदलून गेले!

अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. इव्हेंटमध्ये मलायकाला विचारण्यात आले की, अरबाजपासून वेगळे झाल्यानंतर तिच्या आयुष्यात काय बदल झाला आहे. अभिनेत्रीने सांगितले की, घटस्फोटानंतर तिला अनेक फायदे झाले. याशिवाय खान आडनाव काढून टाकल्यामुळे आपले कोणतेही नुकसान झाले नसल्याचे तिने सांगितले.

अरबाज खानचे गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप! जॉर्जिया एंड्रियानीनं रिलेशनशिपबद्दल केलं स्पष्ट

मलायका म्हणते की, अरबाजसोबतच्या लग्नाने तिच्यासाठी इंडस्ट्रीत अनेक दरवाजे उघडले, पण तरीही तिला तिची प्रतिभा सिद्ध करायची होती. आपल्या नावाला खान आडनाव जोडलेले असूनही, तिने कठोर परिश्रम केले आणि स्वतःसाठी एक मार्ग बनवला. खान कुटुंबियांसोबत तिचे नाते अजूनही चांगले असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. मलायका त्यांचा आदर करते आणि त्या बदल्यात तेदेखील प्रेम देतात, असं ती बोलली. अरबाजपासून घटस्फोटाबाबत मलायका म्हणते की ती आधीही काम करत होती आणि अजूनही काम सुरू आहे. अभिनेत्री म्हणाली की लोक अजूनही तिच्यावर प्रेम करतात, ज्यासाठी ती त्यांची आभारी आहे.

मलायका अरोराचा जिम लुक; फिट कर्वी फिगरचे फोटो व्हायरल

अर्जुनशी लग्न कधी करणार?

या कार्यक्रमात मलायकाने अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्याबद्दलही सांगितले. मलायका म्हणते, अर्जुनने तिच्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरले आहेत. त्याने तिच्या आयुष्यात आनंद आणला आहे. मलायका म्हणते की, आमच्यामध्ये वयाचे अंतर आहे, पण आम्हाला एकमेकांसोबत राहणे आवडते. जर तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असाल आणि आनंदी नसाल तर अशा रिलेशनशिपचा काही फायदा नाही.

मलाइकाला विचारण्यात आले की, तिचे आणि अर्जुन कपूरचे लग्न कधी होणार आहे. यावर अभिनेत्री म्हणते की, सध्या आम्ही आमच्या नात्याचा आनंद घेत आहोत. लग्न कधी, कुठे आणि कसे होईल यावर मी काही सांगू शकत नाही. मलायका म्हणते, आम्ही सध्या आयुष्यावर प्रेम करत आहोत. आम्ही आमच्या प्री-हनिमूनच्या काळात आहोत. जेव्हा वेळ येईल तेव्हा सर्वकाही स्वतःच होईल.

‘हा’ फोटो बघून चाहते अर्जून-मलायका म्हणाले, ब्रेकअप झालंय का?

---------
‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान