Marathi Bigg Boss : जो माणूस स्वतःचा नाही तो...स्नेहा आणि अविष्कारमध्ये उडाले खटके

हल्लाबोल टास्कदरम्यान दोन्ही टीमच्या सदस्यांमध्ये जुंपली
Marathi Bigg Boss : जो माणूस स्वतःचा नाही तो...स्नेहा आणि अविष्कारमध्ये उडाले खटके

कलर्स मराठी माहिनीवरील बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पहिल्या आठवड्यात कोणत्याही स्पर्धकाला घराबाहेर जावं लागलं नाही. परंतू यानंतरच्या आठवड्यात हल्लाबोल या टास्कदरम्यान स्पर्धक आपापसात भिडताना पहायला मिळाले. अविष्कार आणि स्नेहा या घटस्फोटीत नवरा-बायकोत खटके उडताना दिसले.

पहिल्या टीममध्ये सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील या बाईकवर बसल्या, समोरच्या टीममधील लोकांना या दोघांनाही बाईकवरुन उठवण्याचा टास्क होता. सुरेखा आणि सोनाली बाईकवरुन उठल्यानंतर विशाल आणि विकास हे बाईकवर बसलेले असताना अविष्कार पाठीमागून त्यांना धीर देत होता. मी रेडी आहे खेळायला, पण आता तुम्हाला खेळायचे आहे...अविष्कारने असं बोललं असता स्नेहाने अविष्कारला उद्देशून जो माणूस स्वत:चा नाही तो तुमचा काय होणार? असं वक्तव्य केलंय. पाहा व्हिडीओ...

Marathi Bigg Boss : जो माणूस स्वतःचा नाही तो...स्नेहा आणि अविष्कारमध्ये उडाले खटके
Bigg Boss Marathi 3 : Victim Card खेळू नकोस! दोन लग्नांवरुन काम्या पंजाबीने स्नेहा वाघला फटकारलं

हल्लाबोल या टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये शब्दांचे वार काहीकेल्या थांबताना दिसत नाहीये. मीरा, जय, गायत्री, स्नेहा, मीनल एकमेकांना टोमणे मारुन मिळेल त्या प्रत्येक मार्गाचा वापर करुन नामोहरम करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे या टास्कमध्ये कोणती टीम बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Marathi Bigg Boss : जो माणूस स्वतःचा नाही तो...स्नेहा आणि अविष्कारमध्ये उडाले खटके
Bigg Boss Marathi 3 : घटस्फोट झालेले स्नेहा वाघ-अविष्कार दारव्हेकर राहणार एकाच घरात

Related Stories

No stories found.