Anant Ambani Wedding: अनंत-राधिकाच्या लग्नात घुसलेले 'ते' दोन वऱ्हाडी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

anant ambani and radhika merchant wedding two unknown person entered without permession mukesh ambani nita ambani  wedding recepation
अनंत अंबानीच्या लग्नात दोघांनी घुसखोरी केली होती.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनंत राधिकाचा लग्नसोहळा जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला.

point

अनंक अंबानीच्या लग्नात दोघांनी घुसखोरी केली होती.

point

दोन घुसखोरांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

Anant Ambani Radhika Merchant Wedding  : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. जिओ कन्वेक्शन सेंटरमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नसोहळ्यात दिग्गज कलाकारांपासून अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार असल्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र इतका बंदोबस्त असून लग्नात दोघांनी  घुसखोरी केली होती. या दोघांना आा पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या घुसखोरांवर पोलिसांनी काय कारवाई केली आहे? आणि हे घुसखोर कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (anant ambani and radhika merchant wedding two unknown person entered without permession mukesh ambani nita ambani wedding recepation) 

ADVERTISEMENT

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा 12 जुलैला जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला होता. या लग्नसोहळ्याला व्हिव्हिआयपी गेस्ट येणार असल्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र तरी देखील दोघांनी या लग्नसोहळ्यात घुसखोरी केली होती. या दोघांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

हे ही वाचा : Vishalgad : "...ही घटना टळली असती"; शाहू महाराज संतापले, सरकारला सुनावले

मुंबई पोलिसांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार,  अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात घुसखोरी करणाऱ्या दोघांवर  पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पेशाने युट्यूबर असलेल्या व्यंकटेश नरसैया अल्लूरी (26) आणि बिझनेसमन लुकमान मोहम्मद शफी शेख (28) या दोघांना बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दोघांविरूद्ध आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंबानींच्या लग्नात घुसखोरी करणारे दोघेही आंध्रप्रदेशमदून आले होते. या दोन्ही आरोपींवर नोटीस बजावून कारवाई केल्यानंतर आता त्यांची सुटका करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात घुसखोरीची झालेली घटना, ही सुरक्षेत झालेली सर्वांत मोठी चूक मानली जात आहे. कारण या लग्नसोहळ्याला देशातलेच नव्हे तर विदेशातले राजकीय नेते, अभिनेत, अभिनेत्री आले होते. जसे किम कार्दशियन आणि क्लो विग्नेसी यासारख्या अभिनेत्र्या आल्या होत्या. त्यांच्यासोबत बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन, किंग खान शाहरूख खान, सलमान खान असे दिग्गज नेते उपस्थित होते. या कलाकरांसोबत टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी, हार्दीक पंड्या, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा असे अनेक दिग्गज खेळाडू उपस्थित होते. इतकचं नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, लालू यादव यांसारखे राजकारणातली दिग्गज मंडळी देखील उपस्थित होते. त्यामुळे या घटनेला आता गांभिर्याने घेतले जात आहे.

हे ही वाचा : Nashik News : पावसात फिरायला गेले आणि अडकले...,अंजनेरी गडावर भयंकर थरार

दरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे दोघेही 12 जुलैला लग्नबंधनात अडकले होते. यानंतर 13जुलैला अनंत अंबानी याचा शुभ आशीर्वाद सोहळा पार पडला होता. या सोहळ्यानंतर 14 आणि 15 जुलैला रिसेप्शन सुरु आहे. या सोहळ्यानंतर अंबानी कुटुंब लंडनमध्ये देखील सेलिब्रेशन करणार असल्याची माहिती आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT