Bigg Boss Marathi : जान्हवी, डिपीशी भिडला, तरी छोटा पुढारी घराबाहेर कसा पडला?
Bigg Boss Marathi Season 5 : आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणारा छोटा पुढारी 'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप घेताना म्हणाला,''टास्क आहे.. खेळ हा खेळ असतो. मी टास्कमध्ये, खेळामध्ये हरलो असलो तरी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक माणूस म्हणून चांगलं जगण्याचा मी प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बिग बॉसमधून घनश्याम दरवडे आऊट
नॉमिनेशन टास्कमध्ये सात सदस्य नॉमिनेट झाले होते.
या सात सदस्यांपैकी घटश्यामचा प्रवास संपला आहे
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात आज एलिमिनेशन पार पडलं आहे. या एलिमिनेशनमध्ये पुढारी म्हणजेच घनश्याम (ghanshyam darwade) घराबाहेर पडला आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये सात सदस्य नॉमिनेट झाले होते. यामध्ये घन:श्याम दरवडे, निक्की तांबोळी, आर्या जाधव, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अरबाज पटेल निक्की तांबोळी, आर्या जाधव, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अरबाज पटेल या सदस्यांची नावे होती. या सात सदस्यांपैकी घटश्यामचा प्रवास संपला आहे. (bigg boss marathi season 5 chota pudhari ghanshyam darwade out bigg boss marathi latest update)
ADVERTISEMENT
आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध झालेल्या घन:श्यामने 'बिग बॉस मराठी'च्या घरातही चांगलाच धमाका केला. संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये राज्य करण्याचा प्रयत्न घन:श्यामने केला. गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची बिग बॉस मराठीच्या घरातही चांगलीच हवा होती. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म झटपट कसा भरायचा?
आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणारा छोटा पुढारी 'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप घेताना म्हणाला,''टास्क आहे.. खेळ हा खेळ असतो. मी टास्कमध्ये, खेळामध्ये हरलो असलो तरी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक माणूस म्हणून चांगलं जगण्याचा मी प्रयत्न केला आहे. चांगला माणूस कसा असावा हे बिग बॉस मराठीच्या घरामधून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी 100% टक्के बिग बॉस मराठीचा गेम परिपूर्ण खेळलो आहे.''
हे वाचलं का?
भाऊच्या धक्क्यावर सूरजचं कौतुक
भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ कॅप्टन सूरजचं अभिनंदन करणार आहे. त्यावर सूरज म्हणतोय,"गणपती बाप्पा आणि माझ्या टीमने माझी इच्छा पूर्ण केली आहे. माझ्या टीमच्या पाठिंब्यामुळे मी कॅप्टन झालो आहे". त्यावर सूरजला सल्ला देत रितेश भाऊ म्हणतो,"सूरज या कॅप्टन पदाचा कॉन्फिडन्स घ्या. या आठवड्यात जसं बोलत होतात तसं बोलत राहा... काम करत राहा..स्टँड घ्या. कॅप्टन म्हणजे जबाबदारी आहे".
हे ही वाचा : Pooja Khedkar : केंद्र सरकारची पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई
अरबाजच्या पलटी मारण्यावर अभिजीत म्हणाला,"अरबाज पलटी मारणार यावर माझा विश्वास होताच. पण इतकी मोठी पलटी अशा पद्धतीने तो मारेल याबद्दल जरा वाईट वाटलं. घरातील सर्व सदस्यांचा त्याने विश्वासघात केला आहे. जान्हवीने त्याला किती सांभाळलं आहे. त्याच्यासाठी वैभवने निक्कीला सुनावलं होतं की,"काहीही झालं तरी मला बोल पण त्याला काही बोलू नको. त्याच्याजवळ जाऊ नको आणि क्षणातच अशा पद्धतीने फिरणारा माणूस मी आयुष्यात कधीही पाहिला नाही".
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT