सरकारी नाट्यगृहांचा हलगर्जी कारभार, एसी बिघडला, कलाकारांनी अतिउकाड्यात केला प्रयोग, प्रेक्षकांची नाराजी
सरकारी नाट्यगृह अत्यंत हलाखीच्या आणि गलिच्छ परिस्थितीत आहेत. याच्या बातम्या सतत समाजमाध्यमांवर येत असतात. अनेक कलाकारांनीही नाटकाच्या प्रयोगावेळी महाराष्ट्रातील कित्येक थिएटर्सच्या हलाखीच्या परिस्थितीचं चित्रण समाजमाध्यमांवर मांडलं आहे…गेलं दीड वर्ष ही नाट्यगृहं कोरोनामुळे बंद होती. आता पुन्हा नाट्यगृहं सुरू झाली आहेत. मराठी नाटकांचे प्रयोग नाट्यगृहात सुरू झाले आहेत. मात्र या नाट्यगृहांची परिस्थिती मात्र जैसे थे चं […]
ADVERTISEMENT

सरकारी नाट्यगृह अत्यंत हलाखीच्या आणि गलिच्छ परिस्थितीत आहेत. याच्या बातम्या सतत समाजमाध्यमांवर येत असतात. अनेक कलाकारांनीही नाटकाच्या प्रयोगावेळी महाराष्ट्रातील कित्येक थिएटर्सच्या हलाखीच्या परिस्थितीचं चित्रण समाजमाध्यमांवर मांडलं आहे…गेलं दीड वर्ष ही नाट्यगृहं कोरोनामुळे बंद होती. आता पुन्हा नाट्यगृहं सुरू झाली आहेत. मराठी नाटकांचे प्रयोग नाट्यगृहात सुरू झाले आहेत. मात्र या नाट्यगृहांची परिस्थिती मात्र जैसे थे चं आहे.. मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर या सरकारच्या अखत्यारित असलेल्या नाट्यगृहात पुन्हा एकदा हा सरकारी हलगर्जीपणा दिसून आला..
रविवारी दुपारी मुंबईतील प्रभादेवी येथे असलेल्या रविंद्र नाट्यगृहात खरं खरं सांग या नाटकाचा प्रयोग होता.. मात्र हा प्रयोग सुरू होण्यापूर्वीच या नाटकात काम करणाऱ्या कलाकारांना निर्मात्यांना कळलं की रविंद्र नाट्यमंदिराच्या एसी मध्ये बिघाड झाला आहे. एसी बंद असल्याची किंवा बिघाड झाल्याची कोणतीही पूर्वसूचना कलाकारांना, नाटकाच्या निर्मात्यांना रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रशासनाकडून आधी कळवण्यात आली नव्हती. उलट एसीचं काम सुरू आहे, लवकरच एसी सुरू करू अशी हमी या कलाकारांना देण्यात आल्यावर. नाटकातील कलाकारांनी नाटकाच्या प्रयोगाला सुरवात केली.